MarketGuru: Share Market मध्ये गुंतवणूक करायचीय या गोष्टी माहिती असू द्या.

शेअर मार्केट बद्दल छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेऊ या.

updated:2023-01-05 10:43:52

...

Share market: या धावपळीच्या जीवनात सर्वच जण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत. सर्वाना याबद्दल पुरेसे ज्ञान नाही. मात्र कुतूहल तर आहेच. सर्वजण या ना त्या मार्गाने कमी पैसे गुंतवून जास्त नफा कमविण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक लोक याच्या त्याच्या सांगण्यावरून पैसे गुंतवतात पण नंतर त्यांना मात्र तोटा होतो. त्यामुळे शेअर मार्केट बद्दल पुरेसे ज्ञान असणे फार महत्वाचे आहे. 

चला तर आज आपण यात छोटीशी सुरवात करूयात. रोज तुम्हाला शेअर मार्केट बद्दल महत्वाच्या गोष्टी सांगत जाऊ. त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचत जा. 

BSE (बॉम्बे  स्टॉक एक्सचेंज ) आणि NSE (नेशनल स्टॉक एक्सचेंज) हे भारतातील दोन सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहेत याव्यतिरिक्त सुद्धा आणखी काही स्टॉक एक्सचेंज आहेत. 

यामध्ये परदेशी आणि देशातील गुंतवणूकदार एकमेकांशी जोडले जातात.  येथे वेगवेगळ्या कंपन्याची भांडवल गोळा करण्यासाठी नोंदणी केली जाते व सामान्य जनतेला शेअर्स च्या रुपात आपल्या कंपनीची भागीदारी दिली जाते. 

NSE मध्ये जवळपास 2000 कंपन्याची नोंदणी झालेली आहे तर BSE मध्ये 5000 पेक्षा जास्त कंपन्याची नोंदणी झाली आहे. 

यात पुन्हा Equity, Currency, Commodity असे प्रकार पडतात. आज आपण फक्त Equity बद्दल माहिती घेऊ. यामध्ये सर्व NSE व BSE मध्ये असलेल्या नोंदणीकृत कंपन्याचा समावेश होतो. उदा. टाटा मोटर्स, बजाज, मारुती, एसबीआय, सिप्ला, इत्यादी. 

यामध्ये फायदा कमावण्याच्या दृष्टीने तुम्हाला सर्वप्रथम आवश्यक आहे ते Demat Account. बाजारात अनेक application उपलब्ध आहेत त्यावरून तुम्ही ते चालू करू शकता. जर तुम्हाला रोजच्या रोज नफा कमवायचा असेल तर त्याला Intraday Trading असे म्हणतात. यामध्ये तुम्ही दिवसभरात कधीही कितीही शेअर्स विकत घेऊ शकता व दिवसभरात कधीही विकू शकता. जर तुम्ही ते शेअर्स विकले नाहीत तर मार्केट बंद होण्याच्या आधी तुम्ही ज्या ब्रोकरकडे तुमचे अकाऊंट चालू केले आहे तो ते विकतो. पण त्याबद्दल तो विशेष फी आकारतो. तसेच जर तुम्हाला जास्त दिवस शेअर्स विकत घेऊन ठेवायचे असतील तर तुम्हाला शेअर्स विकत घेताना delivery option निवडावा लागेल. यामध्ये तुम्ही कितीही दिवस शेअर्स विकत घेऊन ठेऊ शकता. विशेष म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन ठेवले तर ती कंपनी तुम्हाला दरवर्षी आर्थिक परतावा देते. यामध्ये अजून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्या आपण पुढे पाहूच.

Popular

Technology: