योगासने केल्याने शरीर तंदुरुस्त राहते , मनःशांती, तजेलदार त्वचा मिळते. वजनातही घट होते. योगासने करण्याला वयाची मर्यादा नसते.
updated:2023-01-05 08:52:45
योगासने केल्याने फक्त शरीरच तंदुरुस्त राहत नाही, तर त्यामुळे मनःशांती, तजेलदार त्वचा मिळते. तसेच वजनातही घट होते. योगासने करण्याला वयाची कोणतीही मर्यादा नसते. योगासने दीर्घकाळ फायदे देतात. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये योगासनाला जीवनाचा एक भाग करून घेणे गरजेचे आहे. यामुळे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.तुमच्या शरीरयष्टीनुसार व तुम्हाला असलेल्या व्याधींनुसार योगासने निवडावीत.फक्त शारीरिक स्वास्थ्य असून चालणार नाही, तर मानसिक स्वास्थ्यही गरजेचे आहे. अशा वेळी योगासनेच तुम्हाला मदत करू शकतात. सूर्यनमस्कार, कपालभाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते. आपली यंत्रणा ही शरीर, मन आणि आत्मा या तिघांपासून बनलेली असते.योगासनांमुळे इतर अवयवांना व स्नायूंना बळकटी देण्यात येते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
◆उर्जा शक्ती वाढते
◆शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते
◆अंतर्ज्ञानात वाढ
◆रोगप्रतिकारक शक्तीत वाढ
◆ताण तणावा पासून मुक्ती
◆नाते संबंधात सुधारणा
◆सर्व स्तरांवर तंदुरुस्ती
योगासने करणे आजकालच्या काळात खूप गरजेचे आहे.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: