MPSC UPSC विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित MVF Youtuber चा मराठी चित्रपट...
updated:2023-01-04 14:11:27
MVF म्हणजेच The Viral Fever या Youtuber ने “ यथावकाश ” नावाचा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणला आहे. नुकतेच चित्रपटातील “ लाल दिव्याची गाडी ” हे गाणे MVF या Youtube Channel वर रिलीज करण्यात आले. या आधी सुद्धा TVF या youtube channel ने Aspirants हि वेबसेरीज रिलीज केली होती. प्रेक्षकांनी ही उत्तम प्रकारे दाद दिली होती. चित्रपटातील लाल दिव्याची गाडी हे गाणे रिलीज झाले आहे. यात MPSC UPSC या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची कशाप्रकारे दमछाक होते हे दाखवले आहे.
गाणे जरी Youtube वर रिलीज केले असले तरी गाण्यात हळूहळू सगळे रमू लागतात. चित्रपटात स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्याला सामोर जावे लागणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी याबद्दल सांगण्यात आले असावे. त्या अडचणींना प्रत्येकजण कश्याप्रकारे तोंड देतो. घर, समाज, स्वप्ने यामुळे उद्भवणारी संकटे. आपल्या सोबत असणारे मित्र व वाढत चाललेले वय या सगळ्याबद्दल या एका गाण्यात त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. हे पहिले गाणे रिलीज करतोय असे सांगितले असल्यामुळे अजून कोणत्या प्रकारची गाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतात हे नक्की पाहूया. यात एखादी प्रेमकहाणी सुद्धा आपणास अनुभवायला मिळेल असे वाटते. चला तर तुमच्या प्रमाणे आम्हालाही पुढील उपडेटची उत्सुकता आहे…
Popular
Sports:
Technology:
Job Alert: