पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi yojana

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींचे लग्न, शिक्षण, आरोग्य तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूकीची बचत योजना आहे.

updated:2023-01-04 13:23:40

...

ही केंद्र शासनाची मुलींसाठीची महत्वाकांक्षी योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानअंतर्गत ही योजना २२ जानेवारी, २०१५ रोजी देशभरात सुरू केली.मुलींच्या लग्नाच्या वेळी किंवा उच्च शिक्षण घेताना ही गुंतवणूक अतिशय फायदेशीर ठरते. या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना असेही म्हणतात.
सुकन्या समृद्धी योजना ही मुलींचे लग्न, शिक्षण, आरोग्य तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूकीची बचत योजना आहे.यामध्ये मुलींच्या आईवडिल यांच्याकडून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ मुलीच्या भविष्यासाठी घेऊ शकतात. अशा बँक किंवा पोस्ट खात्यास सुकन्या समृद्धी खाते Sukanya Samriddhi Account असेही म्हणतात.शासनाद्वारे बँकां किंवा पोस्ट ऑफिसमार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या बऱ्याच योजना राबविल्या जातात.सुकन्या समृद्धी बँक किंवा पोस्ट खात्यात दरवर्षी किमान रु. २५०/- किंवा जास्तीत जास्त १.५ लाख पर्यंत रक्कम भरून गुंतवणूक सुरू करता येते.
खाते उघडल्यापासूनच्या तारखेपासून ते मुलीचे २१ वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीच्या लग्नाच्यावेळी योजनेची मॅच्युरिटी होते व चांगल्या व्याजदराने ठेवी परत मिळतात.मुलीचे २१ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी जर मुलीचे लग्न झाले तर सुकन्या समृद्धी योजना खाते आपोआप बंद होते.मुलीने १८ वर्ष पूर्ण केल्यास, मुलीच्या उच्च शिक्षणासाठी मागील आर्थिक वर्षाच्या शिल्लकवर ५०% रक्कम अकाली काढता येऊ शकते.आयकर कायदा १९६१, कलम ८०-सी  Income Tax Act, 1961 80C या कायद्याअंतर्गत कर भरण्यात पूर्ण मिळवता येते sukanya samriddhi yojana tax benefits खाते धारकाचा मृत्यू झाल्यास पालकांना व्याजासाहित जमा रक्कम मिळते.सुकन्या समृद्धी बचत ठेव गुंतवणूक भारत सरकारची १००% सुरक्षित योजना आहे.
सुकन्या योजना कागदपत्रे: सुकन्या समृद्धी योजना प्रपत्र  फॉर्म, मुलीचा जन्म दाखला, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, वीजबिल वरील कागदपत्रे पालकांची असावीत
पालकांना दोन मुली असतील तर दोघींसाठी दोन बचत खाती सुरू करता येऊ शकतात. मातेच्या प्रसूतीवेळी जुळ्या किंवा तीळया मुली झाल्यास त्यांच्याही नावे सुकन्या समृद्धी खाते उघण्याची अनुमती आहे.सुकन्या समृद्धी बँक खात्यात नगद, डिमांड ड्राफ्ट, चेक  किंवा बँकेत कोअर बँकिंग सिस्टमने रक्कम ट्रान्सफर करता येते.

Popular

Technology: