श्रीलंकेचा 2 धावांनी पराभव. दिपक हुडा नाबाद ४१ धावा, शिवम मावीचे 4 बळी...
updated:2023-01-03 17:49:00
हार्दिक पंड्याची विजयी सलामी. पहिल्या T-20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा जमवल्या. भारताकडून दिपक हुडाने 23 चेंडूत १ चौकार आणि 4 षटकार मारत सर्वाधिक 41 धावा केल्या तर शिवम मावीने सर्वाधिक 4 बळी मिळवले. त्याला उत्तर देत श्रीलंकेने 160 धावा केल्या आणि के. रजिता वगळता सर्व गोलंदाजांनीप्रत्येकी एक एक बळी मिळवले. श्रीलंकेकडून डी. शनाकाने 27 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने सर्वाधीक 45 धावा केल्या.
या मालिकेत अजून 2 सामने बाकी आहेत. भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. हार्दिकने या आधी सुद्धा भारतासाठी कर्णधार पद भूषविले आहे. अखेरच्या षटकातील थरार अगदी क्रिकेट रसिकांच्या उत्साहाला शिगेला पोहचवणारा होता.
अखेरच्या षटकात अक्षर पटेलने सुरेख गोलंदाजी करत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला.
सर्वाधिक धावा
भारत
1) दिपक हुडा 41 (23)
2) ईशान किशन 37 (29)
3) अक्षर पटेल 31 (20)
श्रीलंका
1) डी. शनाका 45 (27)
2) के. मेंडीस 37 (25)
3) सी. करुणारत्ने 23 (16)
सर्वाधिक बळी
भारत
1 शिवम मावी 4/22 (4)
2) उमरान मलिक 2/27 (4)
3) हर्षल पटेल 2/41 (4)
श्रीलंका
1) धनंजय डी सिल्वा 1/6 (1)
2) सी. करुणारत्ने 1/22 (4)
3)वानिंदु हसरंगा 1/22 (4)
Popular
Sports:
Technology:
Job Alert: