पुणे: Bhimashankar Wildlife Sanctuary भीमाशंकर अभयारण्य

भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे भीमाशंकर-ज्योतिर्लिंग आहे हे अभयारण्य पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत आहे

updated:2023-01-03 16:01:30

...

भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यात असून पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत आहे.समुद्रसपाटीपासून २,१००—३,८०० फूट उंच आहे. भीमाशंकरचे वन हे पाणगळ, निमहरित आणि सदाहरित असून पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत पसरलेले आहे.
एकूण क्षेत्रफळ १३१ चौ.किमी आहे.महाराष्ट्राचा राज्यप्राणी असून त्याला उडणारी खार. सुमारे ३,००० फूट उंच कड्यांनी दोन भागांत विभागले गेले आहे. मोर, दयाळ, पोपट, कोतवाल, कोकीळ, तांबट, घुबड, खाटीक, चंडोल, रानकोंबडी, धनेश, शिक्रा, ससाणा, घार आणि गरूड इत्यादी पक्षांचा आढळतात या अभयारण्यात वाघ, बिबटे, रानडुक्कर, सोनेरी लांडगा, कोल्हा, काळवीट, मुंगीखाऊ, तरस, वानर, सांबर, भेकर, हरीण इ. प्राणी आहेत याठिकाणी वार्षिक सरासरी ६,००० मिमी. इतका पाऊस पडतो.अभयारण्यातून घोड, भीमा आणि उल्हास या नद्या वाहतात डोंगर उतारांवर आदिवासी महादेव कोळी समाज राहतो. महाराष्ट्राच्या मानचिन्हांपैकी एक असलेल्या शेकरू या सस्तन प्राण्याचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे भीमाशंकर-ज्योतिर्लिंग हे पुण्यापासून १२७ कि.मी. अंतरावर वसले असून ते भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या परिक्षेत्रात येते.
कसे जावे
पुणे ते भीमाशंकर : १२५ कि.मी.
मंचर ते भीमाशंकर : ६५ कि.मी.

Popular

Technology: