या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय एवढेच आहे कि, कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे.
updated:2023-01-02 16:39:14
योजनेत एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्याव्या लागतील.
बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.
२.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५ HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देय असेल.
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषिपंप किमतीच्या १० टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा घोषित केलेला आहे.
महत्वाची कागदपत्रे
आधार कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो,रेशन कार्ड,नोंदणी प्रत,प्राधिकरण पत्र,जमीन प्रत, मोबाइल नंबर, बँक खाते विवरण
वेबसाइट https://kusum.mahaurja.com
पंतप्रधान-कुसुम योजनेच्या नावाने फसव्या वेबसाइट्सपासून सावध रहा.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: