आंबोली: सिंधुदुर्ग थंड हवेचे ठिकाण

आंबोली हे पावसाळ्यातील खास प्रेक्षणीय स्थळ आहे. येथील धबधबे व जैवविविधता खूपच रमणीय आहे. आंबोली  जाण्यासाठी सावंतवाडी येथून बसेस उपलब्ध आहेत. 

updated:2023-01-02 15:02:29

...

कोकण किनारपट्टीच्या भागात सृष्टीसौदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे.चिंचोळा भूप्रदेश म्हणजे नंदनवन आहे.
कोकणास निळ्याशार समुद्र किनार्‍यासोबतच थंड हवेची ठिकाणेही लाभली आहेत. अंबोली घाटाचा सुंदर व रम्य परिसर घनदाट अरण्य व समुद्राने वेढलेला आहे. तिन्ही ऋतूत सृष्टीच्या विविध रूपांचा साक्षात्कार घडवून पर्यटक व निसर्गप्रेमींना आनंद देणार्‍या मोजक्या ठिकाणात अंबोलीचा समावेश आहे.पावसाळ्यात  दर्‍याखोर्‍यातून सगळीकडे शुभ्र धबधबे कोसळतात.उन्हाळ्यातही येथील वातावरण आल्हाददायक असते. महादेवगड, मनोहरगड, श्रीरगावंकर पॉईंट या कड्यांवरून विस्तीर्ण पसरलेल्या दर्‍याखोर्‍या पाहताना विलोभनीय आनंद मिळतो.हिरण्यकेशी नदी उगम पावून संपूर्ण परिसरास हिरवाईचे लेणे देते. तीनशे मीटर रूंदीची गुहाही येथे आहे. 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रहायची सोयही आहे.मुंबईहून येथे बस व रेल्वेनेही पोहचता येते. मुंबईपासून अंबोली घाटाचे अंतर सुमारे साडेपाचशे किलोमीटर आहे.
कसे पोहोचाल?
रस्त्याने
मुंबई-गोवा हायवे
रेल्वेने
सावंतवाडी रेल्वे स्थानक

Popular

Technology: