सुपरहिट: “हाई झुमका वाली पोर” सुपर डुपर हिट...

अहिराणी भाषेतील “हाई झुमका वाली पोर” महिनाभर प्रेक्षकांच्या ओठावर...

updated:2023-01-02 14:47:58

...

मराठी भाषेतील गाणी नेहमीच प्रेक्षकांच्या मनात बसतात. अनेक गाणी अजरामर झाली. त्यातच आता जोड देत अहिराणी भाषेतील गाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांच्या पसंतीस येऊ लागली आहेत. 

जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यात, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचा काही भाग आणि नाशिक जिल्ह्याच्या कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांत अहिराणी भाषा बोलली जाते. या भागातील लोक अहिराणी बोलत असले, तरीही वाचन आणि लेखन यांसाठी प्रमाण मराठीचा वापरण्याचा कल आढळतो. खानदेशीचे दोन बोलीभाषा आहे एक अहिराणी आणि दुसरी डांगरी.

अहिराणी भाषेत या आधी सुद्धा “देख तुनी बायको कशी नाची रायनी” या गाण्याने सुद्धा प्रेक्षकांना वेड लावलं होत. त्यानंतर आता “हाई झुमका वाली पोर” हे गाणे सुपर डुपर हिट झाले आहे. सर्वांच्या ओठावर हे गाणे ऐकायला भेटते. युट्युबवर हे गाणे महिनाभर trending मध्ये होते. एका महिन्यात 43 मिलियन वेळा हे गाणे पाहिले गेले आहे. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. तुम्ही सुद्धा हे गाणे नक्की पहिले असेलच.

Popular

Technology: