सर्व खेळाडूंची वृषभ पंतसाठी भावनिक पोस्ट. लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना...

नुकताच वृषभ पंत या भारतीय क्रिकेटरचा अपघात झाला आहे. त्यामुळे सर्व खेळाडू भावूक झाले आहेत.

updated:2023-01-02 04:14:40

...

भारतीय क्रिकेट संघातील नेहमी चर्चेत असणारा खेळाडू वृषभ पंत याचा अपघात झाल्याचे सर्वांना माहितीच आहे. 150 किमी/प्रतितास इतक्या भरधाव वेगात गाडी चालवत असताना रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असे वृषभ पंतने सांगितले. अपघातात त्याची संपूर्ण गाडी जाळून खाक झाली आहे. त्याच्या पायाला व पाठीला जबर दुखापत झाली आहे. त्याच्या या अपघातामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. 

  त्याच्यासाठी भारतीय संघाचा पूर्व कर्णधार विराट कोहलीने “लवकर बरा हो. तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे” अशी भावनिक पोस्ट ट्विटरवर टाकली आहे. तसेच सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, के एल राहुल, अश्विन आणि माजी खेळाडू मुनाफ पटेल, वीरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, व्ही. व्ही. एस. लक्ष्मन यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

  दररोजचे ठरलेले कामकाज यातून वेळ भेटत नाही. त्यामुळे काही लोक रात्रीच्या वेळेला प्रवास करतात. जेणेकरून वेळ वाचवता येईल. पण ही बाब आपल्या जीवावावर देखील बेतू शकते. त्यामुळे शक्यतो रात्रीचा प्रवास करणे टाळा. जर ते शक्य नसेल तर किमान आपले वाहन मर्यादित वेगात चालवा. जेणेकरून आपण सुखरूप आपल्या ठिकाणी पोहचू.

Popular

Technology: