कसोटीत वृषभ पंत, एकदिवासीय मध्ये श्रेयस अय्यर तर T-20 मध्ये सुर्याकुमार यादव.
updated:2023-01-01 11:20:07
नवीन वर्ष चालू झाले आणि BCCI ने मागील वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंची नावे जाहीर केली. यात कसोटी, एकदिवसीय व T-20 या तिनही प्रकारचा समावेश आहे. संपूर्ण वर्षभरात भारतासाठी कोणी सर्वाधीक धावा व कोणी सर्वाधिक बळी मिळवले याचा समावेश यात आहे.
कसोटीमध्ये वृषभ पंतने 7 सामने खेळत 61.81 च्या सरासरीने सर्वाधिक 680 धावा केल्या आहेत. यात 4 अर्धशतके व 2 शतकांचा समावेश आहे. एका सामन्यात त्याच्या सर्वाधिक 146 धावा आहेत. तर गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहाने सर्वाधिक 22 बळी मिळवले आहेत.
एकदिवसीयमध्ये श्रेयस अय्यरने 17 सामने खेळत 55.69 च्या सरासरीने सर्वाधिक 724 धावा केल्या आहेत. यात 6 अर्धशतके व 1 शतकाचा समावेश आहे. एका सामन्यात त्याच्या सर्वाधिक 113 धावा आहेत. तर गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराजने सर्वाधिक 24 बळी मिळवले आहेत.
T-20 मध्ये सुर्यकुमार यादवने 31 सामने खेळत 46.56 च्या सरासरीने सर्वाधिक 1164 धावा केल्या आहेत. यात 9 अर्धशतके व 2 शतकांचा समावेश आहे. एका सामन्यात त्याच्या सर्वाधिक 117 धावा आहेत. तर गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 37 बळी मिळवले आहेत.
हि सगळी आकडेवारी BCCI ने twitter वर प्रसिद्ध केली आहे.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: