पुणे भीमाशंकर ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे, पुणे, अहमदनगर ,नाशिक या ठिकाणी प्रामुख्याने आढळत
updated:2022-12-31 12:08:25
वसतिस्थान पुणे भीमाशंकर ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे, पुणे, अहमदनगर ,नाशिक या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात
देवदेवता महादेव कोळ्यांची वरसूबाई ही रोग बरी करणारी विशेष देवता आहे. महादेव कोळी समाजाच्या धर्मविषयक कल्पना, सणवार आणि आचार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. वाघ्यादेव(वाघोबा), हिरवा, पांढरी, बयरोबा,काळोबा,वरसुआई,महादेव इत्यादी देव मानतात. सात, घट बसवणे,मोडा पाळणे,वाघ बारस, आखाडचा पाडवा वगैरे सण पाळतात. कळमजाई देवीलाही पूजतात. कळसूबाई, जाकूबाई, सतूबाई, रानाई ,घोरपडाई,देवींला मानतात.
रूढी व परंपरा मुलांना शिकविण्याऐवजी त्यांचे लग्न लवकरात लवकर लावण्याचाच प्रयत्न केला जातो. लग्न वडील माणसांमार्फत ठरते. मुलीचे द्याज देतात. प्रथम साखरपुडा होतो. लग्न मुलीच्या घरी मांडवात होते. लग्नात खूपच बारीकसारीक विधी असतात. आदिवासी महादेव कोळ्यांमध्ये हुंडा घेतला जात नाही व दिलाही जात नाही.
उपजीविका व व्यवसाय महादेव कोळी समाजातील लोकांचा व्यवसाय शेती व जंगलातला रान मेवा गोळा करण्याचा असतो.आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. जंगलातून गोळा करून आणलेल्या वस्तू विकूनही पुरेसे पैसे मिळत नाही.रानं मेव्यावर विशिष्ट भर देतो.
महादेव कोळ्यांच्या शिवनेरीवरील संहार महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला महादेव कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत
Popular
Sports:
Technology:
Job Alert: