१० वी व १२ वी फेब्रु-मार्च २०२३ लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.

फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आज अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले.

updated:2022-12-31 09:50:03

...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या १२वी व १०वी लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

  इयत्ता १०वीच्या लेखी परीक्षेचा कालावधी गुरुवार २ मार्च २०२३ ते शनिवार, २५ मार्च २०२३ या दरम्यान आहे. तसेच इयत्ता १२वीचा कालावधी मंगळवार, २१ फेब्रुवारी २०२३ ते मंगळवार २१ मार्च २०२३ असेल. 

खालील लिंक वर जाऊन तुम्ही सदर वेळापत्रक पाहू शकता.

महाराष्ट्र बोर्ड अधिकृत संकेतस्थळ

इयत्ता १० वीचे वेळापत्रक 

इयत्ता १२ वीचे वेळापत्रक 

Popular

Technology: