भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकार गरीब कुटूंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करते
updated:2022-12-31 06:43:30
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकार गरीब कुटूंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करते. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY अंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभरात चालवली जात आहे. हॉस्पिटलमध्ये ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात.या योजनेच्या माध्यमातून देशातील 10 कोटी कुटूंबांना प्रतिवर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची आयुष्मान भारत योजना घोषणा केली आहे. ही योजना पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी २५ सप्टेंबर २०१९ पासून देशभर लागू करण्यात आली.सामाजिक-आर्थिक जाती जनगणना एसईसीसी २०११ नुसार ग्रामीण भागातील ८.०३ कोटी कुटूंब आणि शहरी भागातील २.३३ कोटी कुटूंबे आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत येतील. सध्या आयुष्मान भारत योजनेत ६२,६६७ कूटूंब पात्र आहेत. अशा प्रकारे पीएम जय योजनेच्या कक्षेत ५० कोटी लोक येतील.ग्रामीण भागात पक्के घर नसलेले, कुटूंबात वयस्क १६-५९ वर्ष नसणे, कुटूंब प्रमुख महिला असणे, कुटूंबात कोणी दिव्यांग असणे, अनुसूचित जाती,जमातीमधील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ति, वेठबिगार मजूर यांना या योजनेसाठी पात्र समजले जाते.आदिवासी लोक कोणतही प्रक्रिया न करता आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात
आयुष्मान भारत योजनेत ABYलाभार्थी रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना कोणताही फी भरावी लागणार नाही. रुग्णालयात दाखल झाल्यापासून उपचाराचा संपूर्ण खर्च या योजनेच्या माध्यमातून कव्हर केला जाईल.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: