शारीरिक शिक्षण एक महत्व

मुलामुलींच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासासाठी आनंददायी, गतिमान व क्षमतावर्धक अशा शारीरिक हालचालींद्वारे नियोजनपूर्वक दिले जाणारे शिक्षण.

updated:2022-12-31 06:16:41

...

विविध शारीरिक हालचालींद्वारे व्यक्तीला मिळणाऱ्या अनुभवाचे संघटित ज्ञान म्हणजे शारीरिक शिक्षण, अशी व्याख्या डी. ओबर्ट्युफर यांनी केली आहे महत्त्वाच्या स्नायु-हालचालींमधून मिळणाऱ्या परिपूर्ण अनुभवाद्वारे बालकाची सर्वाधिक अंतिम टप्प्यापर्यंतची वाढ व विकास साधणाऱ्या प्रक्रिया -समुच्चयास शारीरिक शिक्षण असे म्हणतात, अशी कल्पना ब्राउनेल यांनी मांडलेली आहे.
इंद्रियविकास आणि शरीराची सुदृढता यांवर शरीराची कार्यक्षमता अवलंबून असते. इंद्रियांचा विकास कृतिपूर्ण परिश्रमातून होतो आणि त्यासाठी लहानपणापासून होणाऱ्या हालचाली कारणीभूत ठरतात.सर्व नैसर्गिक हालचाली प्रयत्नाने आणि सरावाने हळुहळू सफाईदार होत जातात. चालणे, धावणे, उड्या मारणे, फेकणे, झेलणे, शरीराचा तोल सांभाळणे या मूलभूत क्रिया सहजपणे व कौशल्यपूर्ण होणे आवश्यक असते.शारीरिक आरोग्यामध्ये व्यक्तिगत स्वच्छता, व्यायाम, आहार, आरोग्यविषयक सवयी, विश्रांती, मनोरंजन इत्यादींचा समावेश होतो. ह्या सर्व गोष्टी शारीरिक शिक्षणांतर्गत समाविष्ट होतात.शारीरिक शिणातील विविध क्रीडांमध्ये अनेक वेळा तत्काळ निर्णय घेण्याचे प्रसंग येतात. उदा., कबड्डीमध्ये घोटापकड केव्हा करावी, चढाई वा बचाव केव्हा करावा, या संदर्भात तत्क्षणी चटकन व योग्य निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होऊ शकते.आत्मविश्वास, सदाचार, धैर्य, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, दया, न्याय, तत्परता, निष्ठा इ. वैयक्तिक गुणांचा विकास शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून होतो.

Popular

Technology: