महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीत विचारले गेलेले निवडक प्रश्न.

राज्यसेवेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेत असते. त्यात विचारले गेलेले काही निवडक प्रश्न व ते कशाप्रकारे विचारले जात

updated:2022-12-28 18:04:04

...

राज्यसेवा म्हटलं की डोळ्यासमोर येते महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि परीक्षेचा अभ्यासक्रम. सोबतच परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी. परिक्षेचा विचार केला तर सर्वात आधी पूर्व परीक्षेत पास झालेले विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. मुख्य परीक्षा व इतर सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत. मुलाखतीचे स्वरूप व गुणदान याची सविस्तर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर आपल्याला पहावयास मिळेल. 

   मुलाखतीत उमेदवाराला कोणते प्रश्न विचारले जातात. कशाप्रकारे विचारले जातात याची सगळ्यांनाच उस्तुकता असते. 

मुलाखतीत विचारले गेलेले काही प्रश्न:

  1. भारताने अनेक बाबतीत रेकॉर्ड केले आहेत? तुम्हाला काही आठवतंय का? सांगा.
  2. दारिद्रयरेषा काय आहे?
  3. तुमचा आधार क्रमांक सांगा.
  4. तुमचा Driving Licence no. सांगा.
  5. अल्पसंख्यांक सामुदायासामोरील आव्हाने कोणती?
  6. हुंडाबंदी कायदा कधी करण्यात आला?
  7. जमिनीचा सर्व्हे करण्याचा उद्देश काय?
  8. कॉलेज झाल्यापासून एवढे वर्षे झाले अजून जॉबसाठी प्रयत्न करत आहात. कॉलेज झाल्यावर लगेच UPSC/MPSC का नाही केली?
  9. तलाठी कार्यालय / इतर कोणत्याही कार्यालयाला भेट दिलीय का? तुमचा अनुभव कसा होता?
  10. कुपोषण व महाराष्ट्र यावर बोला.
  11. T.Y. चे विषय किती? कोणकोणते?
  12. प्रशासनामधील स्त्रिया?
  13. मला असं वाटतंय की प्रशासानामाध्ये स्त्रियांची आवश्यकता नाहीये. यावर तुमचं काय मत आहे?
  14. पदवीचा प्रशासनात काय उपयोग?
  15. तुमची आवड/ छंद 
  16. GDP किती आहे? growth rate किती?
  17. DYSP ला किती Star असतात? Promotion कोणत? त्यांना किती Star असतात? 
  18. हल्ली जिम करणारे Heart Attack ने मरत आहेत काय कारण आहे?
  19. अश्रुधुराचा वापर केव्हा कराल? एखादी Casualty झाली तर तुम्हाला संरक्षण आहे? कसं?
  20. उपजिल्हाधिकारी झालात तर तुमच्या जिल्ह्यासाठी काय कराल?

असे प्रश्न मुलाखती दरम्यान विचारले जातात.

Popular

Technology: