श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि T-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर...

एकदिवसीय मालिकेसाठी रोहित तर T-२० साठी हार्दिक कर्णधार. ३ जानेवारी पासून मालिकेला सुरवात...

updated:2022-12-28 05:46:00

...

भारतीय वरिष्ठ निवड समितीने जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या भारताच्या आगामी मास्टरकार्ड श्रीलंका दौर्‍यासाठी भारताच्या संघांची निवड केली आहे. या दौऱ्यात तीन T20 आणि अनेक एकदिवसीय सामने आहेत. ३ जानेवारी पासून श्रीलंकेविरुद्ध सुरु होणाऱ्या एकदिवसीय व T-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार तर  हार्दिक  पंड्या उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली. तसेच T-२० मालिकेसाठी हार्दिक पंड्या कर्णधार व सुर्यकुमार यादवची उपकर्णधार पदी वर्णी लागली आहे. 

नियोजित सामने 

अ. क्र.तारीख ठिकाण  सामना वेळ 
13 जानेवारी 2023मुंबई T-20 17:00 PM
25 जानेवारी 2023पुणे T-20 27:00 PM
37 जानेवारी 2023राजकोट T-20 37:00 PM
410 जानेवारी 2023गुवाहाटी ODI101:30 PM
512 जानेवारी 2023कोलकाता ODI201:30 PM
615 जानेवारी 2023त्रीवान्दृम ODI301:30 PM

एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

T-20 संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (व्हीसी), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक , शिवम मावी, मुकेश कुमार.

Popular

Technology: