Twitter चं जबरदस्त फिचर!

आता किती लोकांनी ट्विट पाहिलं हे कळणार, जाणून घ्या डिटेल्स...

updated:2022-12-27 09:18:48

...

इलॉन मस्कनं ट्विटरची मालकी स्वीकारल्यानंतर कंपनीत वेगवेगळे बदल केले जात आहेत. ब्लू, यलो आणि ग्रे व्हेरिफिकेशन टिक मार्क तसंच स्वेअर प्रोफाइल फोटोनंतर कंपनीनं नवं फिचर आणलं आहे. नव्या फिचर अंतर्गत आपण केलेलं ट्विट किती जणांनी पाहिलं आहे हे सहज कळणार आहे. खरंतर हे फिचर याआधीही ट्विटरची अस्तित्वात होतं. पण ते प्रायव्हेट होतं. 

आपलं ट्विट किती जणांनी पाहिलं आहे हे जाणून घेण्यासाठी यूझर्सना इनसाइट तपासावं लागायचं. पण आता इनसाइटमध्ये जाण्याची गरज नाही. यूझर्सना होम स्क्रीनवरच कोणतंही ट्विट किती जणांनी पाहिलं आहे याचा व्ह्यू काऊंट दिसणार आहे. मस्क यांनी या नव्या फिचरची माहिती दिली आहे. 

नवं फिचर का आणलं गेलं?इलॉन मस्क यांनी सांगितलं की, ट्विटरवर व्ह्यू काऊंट फिचर सुरू करण्यात येणार आहे. यामुळे तुमचं ट्विट किती लोकांनी पाहिलं आहे हे कळू शकणार आहे. हे व्हिडिओ व्ह्यू सारखंच आहे. याशिवाय आपल्या ट्विटवर किती युझर्स अॅक्टीव्ह आहेत याचीही माहिती मिळणार आहे. 

कंपनीनं सांगितलं की नवं फिचर अँड्रॉइट आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. लवकरच हे फिचर वेब वरही येईल. व्ह्यू काऊंटवर यूझर्सना दिसेल की त्यांनी केलेलं ट्विट किती जणांनी पाहिलं आहे. ट्विटरचा व्ह्यू काऊंट पब्लिक असणार आहे. म्हणजेच ट्विटरवर असणारा प्रत्येक युझर या प्लॅटफॉर्मवर किती लोकांनी ट्विट पाहिलं आहे हेही कळणार आहे. 

Popular

Technology: