52 वर्षानंतर ऑलिम्पिक मध्ये सलग दुसरे कांस्य पदक..
updated:2024-08-09 07:36:02
ऑलिम्पिक 2024 : उपांत्य फेरीत धडक मारत संघाने आपल्या दिग्गज गोलरक्षकासाठी सुवर्ण संधी निर्माण करून दिली होती. परंतु, थोडक्यात झालेल्या पराभवामुळे अखेर पुन्हा एकदा श्रीजेशसह संपूर्ण देशाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, या यशाचाही सुवर्ण जल्लोष करत श्रीजेशने समाधानाने हॉकीतून निरोप घेतला. या शानदार विजयासह भारतीय संघाने दिग्गज गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याला यशस्वी निरोपही दिला.
पहिला क्चार्टर गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर १८व्या मिनिटाला मार्क मिरालेस याने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत स्पेनला आघाडीवर नेले. कर्णधार हरमनप्रीत सिंगने तीन मिनिटांमध्ये दोन गोल केले. स्पेनचा 2-1 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताचं हे एकूण 13 वं तर चौथं कांस्य पदक ठरलं आहे. भारताची ही ऑलिम्पिक स्पर्धेत सलग कांस्य पदक जिंकण्याची दुसरी वेळ ठरली आहे. भारताने पॅरिसआधी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ही कामगिरी केली होती. तर त्याआधी 1968 आणि 1972 मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं. तसेच भारताने 8 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकही मिळवलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला चौथं आणि कांस्य पदक मिळालं आहे. हॉकी टीम इंडियाने स्पेनवर 2-1 ने मात करत पदक मिळवलं आहे. भारतासाठी कॅप्टन हरमनप्रीत सिंह यानेच दोन्ही गोल केले. टीम इंडियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्येही कांस्य पदक मिळवलं होतं. टीम इंडियाने तिसरं सत्र आपल्या नावावर केलं.
लवकरात लवकर आपडेटसाठी
Click here to JOIN TELEGRAM CHANNEL
WHATSAPP GROUP Join करण्यासाठी 9975327830 वर Join Updates marathi असा मेसेज करा
हे पण पाहा >> विज्ञान-तंत्रज्ञान मनोरंजन क्रीडा नोकरी-करिअर
Popular
Sports:
Technology:
Job Alert: