निर्णय घेणारा सिंगापूर बनला आशिया खंडातील पहिला देश. जिथे आता आठवड्यातून चार दिवस काम करण्याची परवानगी आहे.
updated:2024-04-24 12:13:54
Singapore : सिंगापूर ह हा आशियातील पहिला देश बनला आहे, जिथे आता आठवड्यातून चार दिवस काम करण्याची परवानगी आहे. नवीन दिशानिर्देश १ डिसेंबर २०२४ रोजी लागू होतील. यासोबतच कर्मचाऱ्यांना अधिकाधिक घरून काम करण्याची आणि त्यांच्या आवडीनुसार शिफ्टमध्ये काम करण्याची संधी मिळेल. दरम्यान, हा निर्णय घेऊन सिंगापूर सरकारने युनायटेड किंगडम आणि आयर्लंड, फिनलंड, पोर्तुगाल आणि बेल्जियमसारख्या देशांच्या यादीत सामील झाले आहे, जिथे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेळेनुसार काम करण्याची परवानगी दिली जाते.
हे पण पाहा >> जाहीरात महत्वाच्या सूचना प्रवेशपत्र निकाल
सिंगापूरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, अधिकारी आणि कर्मचारी पगार आणि नोकरीच्या सुरक्षिततेनंतर नोकरीमध्ये फ्लेक्सिबिलिटी हा तिसरा महत्त्वाचा घटक मानतात. अशा परिस्थितीत त्यांना आणखी आकर्षित करण्यासाठी त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारच्या या नियमानंतर कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू होईल, असे नाही. माहितीनुसार, कंपनीचा मालक किंवा बॉस तुमची रजा किंवा इतर सुविधा रद्द करू शकतात, जर त्यांना त्याची गरज वाटली तर.
मात्र, त्यासाठी ते आम्ही या कायद्याचे पालन करू शकत नाही किंवा ते आमच्यासाठी फायदेशीर नाही, असे कारण देऊ शकत नाहीत. इतकंच नाही तर नवीन दिशानिर्देशांमध्ये महिला आणि वृद्ध कर्मचाऱ्यांना जास्त रजा घेण्याचाही उल्लेख आहे. त्यांना दीर्घकाळ घरून काम करण्याचा अधिकारही असेल. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या सोयी लक्षात घेऊन घरून काम करण्यावरही भर दिला जात आहे.
लवकरात लवकर आपडेटसाठी
Click here to JOIN TELEGRAM CHANNEL
WHATSAPP GROUP Join करण्यासाठी 9975327830 वर Join Updates marathi असा मेसेज करा
हे पण पाहा >> विज्ञान-तंत्रज्ञान मनोरंजन क्रीडा नोकरी-करिअर
Popular
Sports:
Technology:
Job Alert: