जीवनात आपण यशस्वी व्हायला हवं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी आपण आपले तास, दिवस, वर्ष कसे घालवतो याचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच आपण वेळ फुकट घालवणाऱ्या गोष्टी बंद केल्या पाहिजे. कोणत्या कामाला किती वेळ दिला पाहिजे, त्यानुसार कामांचे विभाजन करायला हवे...
मंत्र मोठ्या यशाचे
मंजिले उन्हीको मिलती है, जिनके सपनों मे जान होती है, बस यू ही पंख होनेसे कुछ नही होता, हौसलो से उडान होती है..!!
जीवनात आपण यशस्वी व्हायला हवं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी आपण आपले तास, दिवस, वर्ष कसे घालवतो याचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच आपण वेळ फुकट घालवणाऱ्या गोष्टी बंद केल्या पाहिजे. कोणत्या कामाला किती वेळ दिला पाहिजे, त्यानुसार कामांचे विभाजन करायला हवे…
हे पण पाहा >> जाहीरात महत्वाच्या सूचना प्रवेशपत्र निकाल
- सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकू नका : सोशल मीडियात अनेक वेबसाईट्स येतात. त्यामध्ये फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम असे अनेक आहेत. अनेक लोक सोशल मीडियावर तास न तास अॅक्टिव्ह असतात. तसेच ऑनलाइन गेम खेळणे अथवा चॅटिंग करण्यात पण अनेक जण गुंग असतात. ऑनलाईन किती वेळ घालवायचा हे जर तुम्ही ठरवले नसेल तर कधी मिनिटांचे तास आणि तासांचे दिवस होऊन जातील कळणारही नाही. या सोशल मीडियाच्या जगातून बाहेर पडायचे असेल, तर वेळेचे नियोजन करून वेळेची मर्यादा पाळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सोशल मीडिया आज काळची गरज आहे हे जरी मान्य केलं, तरी पण यशस्वी होण्यासाठी त्याच्या आहारी जाऊ नका
- स्वतःला प्राधान्य द्या: तुमची आवड निवड ओळखा. या यादीत तुमचा वेळ घालवणाऱ्या गोष्टी आहेत का? जर असतील, तर त्यांना तुमच्या आयुष्यातून हद्दपार करा आणि तुमच्या आयुष्याचा स्वतः ताबा घ्या. बऱ्याच वेळा कामामुळे पुरेशी झोप किंवा व्यायाम होत नाही. परिणामी तुम्हाला कंटाळा, आळस, निरस्ता येते. याच्या व्यतिरिक्त शारीरिक व्याधी किंवा आजारपण अनेकांना येऊ शकते. म्हणून यशासाठी तुम्हाला या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही स्वतः साठी वेळ काढला पाहिजे आणि स्वतः ला प्राधान्य दिले पाहिजे. ज्या गोष्टी केल्याने मन प्रसन्न राहते त्या आवर्जून करा. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टींनी दिवसाची सुरुवात करता तेव्हा संपूर्ण दिवस तुम्ही आनंदी, उत्साहित आणि सुदृढ राहता
- इतर लोकांचा विचार नको : इतर लोक काय करतात याचा विचार तुम्ही करू नका. कारण तुम्ही विचार करेपर्यंत ती व्यक्ती तुमच्या खूप पुढे निघून गेलेली असेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्याशी तुलना करू लागता तेव्हा तुमच्या ध्येयाला उतरती कळा लागते. तुलना करायचीच असेल तर ती स्वतःशी करा. दुसऱ्याशी नाही. तुमचे विचार बदला आणि इतरांकडून प्रेरित व्हा.
- भूतकाळातील चुकांसाठी रडू नका: प्रत्येकाच्या हातून दैनंदिन आयुष्यात काही ना काही चुका होतात. ज्या चुका तुमच्या हातून झाल्यात त्या तुम्ही बदलू शकत नाही पण त्या तुम्हाला बरंच काही शिकवून जातात. त्यामुळे जेव्हा तुमच्याकडून काही चुकी होईल, तेव्हा त्या विचारांतून बाहेर पडा. यशस्वी होणे म्हणजे प्रत्येक चुकीतून अनुभव घेत राहणं, झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न करणे व चुकांमधून घडत जाणे हेच होय.
लवकरात लवकर आपडेटसाठी
Click here to JOIN TELEGRAM CHANNEL
WHATSAPP GROUP Join करण्यासाठी 9975327830 वर Join Updates marathi असा मेसेज करा
हे पण पाहा >> विज्ञान-तंत्रज्ञान मनोरंजन क्रीडा नोकरी-करिअर