आरोग्य : उत्तम झोप ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

झोप ही अन्न, पाण्याइतकीच आपली महत्त्वाची गरज आहे. ती आपल्या शरीराची एक जैविक गरज आहे.

updated:2024-04-14 08:06:29

...

आरोग्य : उत्तम आरोग्यासाठी झोप ही आवश्यक आहे. उत्तम झोप ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. झोपेसाठी माणूस वाट्टेल ते करतो पण अनेकदा बदलत्या लाईफस्टाईलमुळे झोप होत नाही आणि याचा परिणाम आपल्या दैनंदि आयुष्यावर होतो.

झोप ही अन्न, पाण्याइतकीच आपली महत्त्वाची गरज आहे. ती आपल्या शरीराची एक जैविक गरज आहे. झोपेमध्ये आपल्या शरीरात महत्त्वाचे जैविक बदल होत असतात. यावरुन झोपेतील बिघाड आपल्या आयुष्यावर किती परिणाम होऊ शकतो याचा अंदाज येईल.

झोप ही शरीराची पुनुरावर्ती अवस्था. या अवस्थेमध्ये बाह्य जाणीवा कमी होतात. ज्ञानेंद्रियाकडून आलेले संवेद मेंदूकडे पूर्णपणे नेले जात नाहीत. ऐच्छिक स्नायूंचे कार्य शिथिल होते. झोपेमध्ये जागृतावस्थेमधील शरीराची प्रतिक्रिया कमी होते. चेताकडून आलेल्या उत्तेजनाना प्रतिसाद मिळत नाही. ही अवस्था परिवर्तनीय आहे. चेताउद्भवी रसायने चेतामधून स्त्रवत असतात. मेंदू आणि मज्जारज्जू याना जोडणा-या मस्तिष्कस्तंभ चेतापेशीमधून सिरोटोनिन आणि नॉर इपिनेफ्रिन नावाची दोन रसायने स्त्रवतात. नॉरइपिनेफ्रिन मेंदूमधील बहुतेक भाग आपण जागे असता कार्यक्षम ठेवते. मस्तिष्कस्तंभाच्या तळाशी असलेल्या काहीं पेशीनी पाठविलेल्या संवेदामुळे झोप येण्यास प्रारंभ होतो. जागृत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या चेतापेशींचे कार्य तात्पुरते थांबते. अशा वेळी जागे राहणे अशक्य होते. या वेळी रक्तामध्ये अडिनोसिनचे प्रमाण वाढते झोप यायला लागली आहे असे आपण अशा वेळी म्हणतो. झोपेत असताना अडिनोसिनचे विघटन होते.

हे पण पाहा >> विज्ञान-तंत्रज्ञान   मनोरंजन   क्रीडा   नोकरी-करिअर   शेअर मार्केट

वयानुसार किती तासांची झोप घ्यावी? 

  • 6 ते 9 वयाच्या मुलांसाठी 9 ते 11 तासांची झोप
  • 12 ते 16 वयाच्या मुलांसाठी 8 ते 10 तासांची झोप
  • 18 ते 64 वयाच्या व्यक्तींसाठी 7 ते 9 तास
  • 65 वर्षांवरील वृद्धांसाठी 7 ते 8 तास झोप

हि काळजी घ्या -

  • साधारणत: रात्रीची झोप ही आरोग्यासाठी उत्तम असते. रात्री 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे.
  • रात्री झोपण्यापूर्वी चहा आणि कॉफीचं सेवन चुकूनही करू नये. कॅफिनसारख्या उत्तेजक घटकामुळे तुमची झोप मोडू शकते.
  • हेल्दी आहार घ्या. कमी खा आणि झोपण्यापूर्वी तीन चार तास आधी खा अन्यथा अपचनाचा त्रासामुळे तुमची झोप बिघडू शकते.
  • शक्यतो रात्री व्यायाम करणे टाळावा. तुम्हाला निद्रानाशची समस्या निर्माण होऊ शकते. झोपण्याआधी तीन चार तास आधी तुम्ही व्यायाम करू शकता.

लवकरात लवकर आपडेटसाठी 

Click here to JOIN TELEGRAM CHANNEL

JOIN WHATSAPP GROUP massage Updates marathi on 9975327830

जाहीरात    महत्वाच्या सूचना    प्रवेशपत्र    निकाल

Popular

Technology: