स्पर्धेच्या जगात टिकायचे असेल तर ज्याला वेळेचे गणित जमले तोच बाजी मारू शकतो.
updated:2024-03-30 10:08:35
MPSC : आपल्या आजूबाजूला मित्र परिवारात आपल्याला अनेकजन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना दिसतात. यामध्ये सरळसेवा भरती, पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन अश्या वेगवेगळ्या संवर्गाचा समावेश असतो. यातील एक मोठा वर्ग तो मात्र आपल्याला वळलेला दिसतो तो MPSC या क्षेत्राकडे…
MPSC परीक्षेत यश मिळवून अधिकारी बनण्याचे अनेकजण स्वप्न बाळगतात. अभ्यासाला सुरवातही करतात. पण मध्येच त्यांची गाडी कुठे तरी आडते. याचे कारण म्हणजे परीक्षेचे स्वरूप समजून घेऊन वेळेचे न केलेलं नियोजन. या क्षेत्रात उतरण्या आधी परीक्षेचे स्वरूप आणि किती वेळ द्यावा लागेल हे समजून घेणे गरजेचे आहे. या क्षेत्रात उतरल्यापासून कमीत कमी आपल्या आयुष्यातील 2 ते 3 वर्षे आपल्याला खर्च करावी लागतात.
हे पण पाहा >> रजेसाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावा लागणार आता ऑनलाइन अर्ज
ती अशी - परीक्षेचे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत असे टप्पे असतात. यामध्ये पूर्व परीक्षेची तयारी कमीत कमी 6 महिने आधी करणे. पूर्व परीक्षेचा निकाल व मुख्य परीक्षा यामध्ये 5 ते 6 महिने अंतर असते. मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत होते. हा सगळा प्रवास कमीत कमी दीड ते 2 वर्षाचा असतो.
यामध्ये यश अपयश या सगळ्यातून मार्ग काढता काढता आयुष्यातील 4 5 वर्षे निघून जातात. त्यामुळे ज्याला MPSC आणि वेळेचे गणित जमले तोच या क्षेत्रात बाजी मारू शकतो. परीक्षेची गरज ओळखणे आणि त्यानुसार अभ्यास करणे व योग्य वेळी बाहेर पडणे हि सर्वात महत्वाची बाब आहे.
लवकरात लवकर आपडेटसाठी
Click here to JOIN TELEGRAM CHANNEL
JOIN WHATSAPP GROUP massage Updates marathi on 9975327830
Popular
Sports:
Technology:
Job Alert: