एनआयएची धुरा मराठी अधिकाऱ्याकडे सदानंद दाते यांची महासंचालकपदी नियुक्ती
updated:2024-03-28 15:34:38
NIA : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी कामा रुग्णालयात दहशतवाद्यांशी मुकाबला करणारे भारतीय पोलिस सेवेतील महाराष्ट्र केडरचे अधिकारी सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या एनआयए महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२६पर्यंत या पदावर त्यांची नियुक्ती असेल. १९९०च्या भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी असलेले सदानंद दाते सध्या महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी दलाचे प्रमुख आहेत. याच पदावरून त्यांची एनआयएमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, दाते यांच्या बॅचचे व महाराष्ट्र केडरचे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी सध्या एनआयएमध्ये विशेष महासंचालक आहेत. कुलकर्णी यांच्यानंतर दाते हे महाराष्ट्र केडरमधून एनआयएमध्ये जाणारे दुसरे अधिकारी ठरले आहेत. दरम्यान, राजस्थान कॅडरचे अधिकारी राजीव कुमार शर्मा यांना पोलिस संशोधन व विकास ब्युरोचे महासंचालक, तर उत्तर प्रदेश कॅडरचे पीयूष आनंद यांची एनडीआरएफच्या प्रमुख पदी नियुक्ती केली.
हे सुद्धा पाहा >> जाहीरात - महत्वाच्या - सूचना - प्रवेशपत्र - निकाल
पोलिस दलात कर्तव्यकठोर अशी सदानंद दाते यांची प्रतिमा आहे. मीरा - भाईंदर पोलिस आयुक्तालयाचे ते पहिले पोलिस आयुक्त होते, तर मुंबईतही त्यांनी कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह-आयुक्त तसेच गुन्हे शाखेचे सह-आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पीएच. डी. संपादित केली.
लवकरात लवकर आपडेटसाठी
Click here to JOIN TELEGRAM CHANNEL
JOIN WHATSAPP GROUP massage Updates marathi on 9975327830
Popular
Sports:
Technology:
Job Alert: