Ind vs Zim : टीम इंडिया चालली झिम्बाब्वे दौऱ्यावर! या महिन्यात होणार पाच सामन्यांची टी-20 series

जवळपास आठ वर्षांनंतर टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या जुलैमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामने खेळणार आहे.

updated:2024-02-06 14:47:16

...

Ind vs Zim : 2016 नंतर भारत टी-20 मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ असेल. झिम्बाब्वे क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI मंगळवारी ही घोषणा केली. 6 जुलैपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. शेवटचा सामना 14 जुलै रोजी होणार आहे. झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तवेंगवा मुकुहलानी म्हणाले, जुलैमध्ये होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारताचे यजमानपद भूषवताना आम्ही खूप उत्साही आहोत. या वर्षी आमचे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय आकर्षण घरच्या मैदानावर असेल. भारताचा प्रभाव आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचा क्रिकेट खेळाला नेहमीच खूप फायदा झाला आहे आणि मी पुन्हा एकदा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वचनबद्ध झाल्याबद्दल बीसीसीआयचे खूप आभार मानू इच्छितो. द्विपक्षीय टी-20 मालिकेत झिम्बाब्वे भारताचे यजमानपद भूषवण्याची ही चौथी वेळ असेल. यापूर्वी ही मालिका 2010, 2015 आणि 2016 मध्ये खेळवण्यात आली होती. भारताने 2010 आणि 2016 मध्ये विजय मिळवला होता. त्याच वेळी, 2015 मध्ये मालिका अनिर्णित राहिली. बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, बीसीसीआयने जागतिक क्रिकेट समुदायाला योगदान देण्यात नेहमीच आघाडीची भूमिका बजावली आहे. आम्हाला समजते की हा झिम्बाब्वेच्या पुनर्बांधणीचा काळ आहे आणि झिम्बाब्वे क्रिकेटला यावेळी आमच्या पाठिंब्याची गरज आहे.

Popular

Technology: