भारतीय गोलंदाज बुमराहच्या या ट्विटवरून हे स्पष्ट झाले आहे की तो 4 सप्टेंबरला सकाळी बाबा झाला आणि संजना गणेशन आई झाली.
updated:2023-09-04 07:07:59
Jasprit Bumrah : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने आज सकाळी मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माने झालेला आंनद बुमराहने सर्वांसोबत शेअर केला आहे.
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी घरातील छोट्या पाहुण्याचे नाव अंगद ठेवलं आहे. म्हणजे बुमराह आणि संजना मुलगा अंगदचे आई-वडील झाले आहेत.
यापूर्वी 3 सप्टेंबरला जसप्रीत बुमराह आशिया कप सोडून भारतात परतल्याची बातमी आली होती. या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बुमराहला काय झाले असेल यावर विविध अंदाज बांधले गेले. आशिया कपमध्ये एकही षटक न टाकता तो भारतात का परततोय? पण आता याचे उत्तर सर्वांसमोर आहे. बुमराह पहिल्यांदाच बाबा बनणार आहे, त्यामुळे तो भारतात आला होता.
जसप्रीत बुमराहने बाबा झाल्याचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने एक्स-हँडलवर लिहिले की, आमचे छोटे कुटुंब आता थोडे मोठे झाले आहे. अंगद जसप्रीत बुमराह आमच्या घरी आला आहे आणि यासोबतच आमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली आहे.
भारतीय गोलंदाज बुमराहच्या या ट्विटवरून हे स्पष्ट झाले आहे की तो 4 सप्टेंबरला सकाळी बाबा झाला आणि संजना गणेशन आई झाली.
Tweet -
Our little family has grown & our hearts are fuller than we could ever imagine! This morning we welcomed our little boy, Angad Jasprit Bumrah into the world. We are over the moon and can’t wait for everything this new chapter of our lives brings with it - Jasprit and Sanjana
लवकरात लवकर आपडेटसाठी
Click here to JOIN TELEGRAM CHANNEL
JOIN WHATSAPP GROUP massage Updates marathi on 9975327830
Popular
Sports:
Technology:
Job Alert: