Health Tips: उन्हाळ्यात अंगावर येणारा घाम, भूक मंदावणे, पचन शक्ती मंदावते, सतत तहान तहान होणे, थकवा, त्वचेला स्निग्धतेची गरज भासते, डिहायड्रेशन, हिट स्ट्रोक, अशक्तपणा त्यामुळे आपला आहार कमी होतो व आपली रोगप्रतिबंधक शक्ती मंदावते. क्षारांचे प्रमाण कमी होऊन चक्कर येऊ शकते. सनबर्न, घामोळ्यासारखे त्वचा विकार इ. प्रकारचे आजार दिसतात.
- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारामध्ये खालील गोष्टीचा समावेश करावा :
- शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी पाणी, पाण्यात वाळा, मोगरा, पुदिना इ. वस्तूंचा वापर करून पाणी प्यावे.
- कॉफी, चहा यांसारख्या उत्तेजक पेयांचा वापर टाळून आहारात नारळाचे पाणी, ताक, लिंबूपाणी, बार्लीचे पाणी यांचा वापर करावा.
- आहारात तेलकट, मसाल्याचे पदार्थ टाळावेत.
- आहारामध्ये सुंठ, सैंधव, जीरे, ओवा यांसारखा पदार्थांचा वापर करावा- ज्यामुळे पचनास मदत होईल.
- तहान लागावी म्हणून धणे, जिरे यांचे पाणी, कोकम सरबत, पन्हे यांचा वापर करावा. कोल्डड्रिंक्सचा वापर टाळावा.
- पाणीयुक्त फळे उदा. खरबूज, कलिंगड, जाम, करवंदे यांचा वापर करावा.
- आहारात पाणीयुक्त भाज्या, काकडी, पालेभाज्या, पुदिना, टोमॅटो, कांदा यांचा वापर करावा.
- आहारात प्रथिनांसाठी उन्हाळ्यामध्ये मोड आलेली कडधान्ये, डाळींचा वापर करावा.
- उन्हाळ्यामध्ये बदाम, काळ्या मनुका, सुके अंजीर, जर्दाळू यांसारख्या सुक्यामेव्याचा वापर करावा.
- रात्रीचा आहार हलका असावा. त्यामध्ये कढी, सार, खिचडी, पालेभाजी-आमटी, दहीभात यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा.
- दिवसभरात १५-१६ ग्लास पाणी प्यावे.
- माठातले पाणी प्यावे.
हेही पाहा >> Mental health: मानसिकदृष्ट्या मजबूत राहा. या सोप्या स्टेप्स करा फॉलो
उन्हाळ्यासाठी काही पेये घ्यावीत
- लिंबू/ आवळा/ कोकम/ पन्हे यांसारखी सरबते
- मठ्ठा
- ताक
- उसाचा रस.
हेही पाहा >> लॅपटॉप वापराताना काळजी घ्या नाहीतर…
लवकरात लवकर आपडेटसाठी
JOIN TELEGRAM CHANNEL
JOIN WHATSAPP GROUP massage Updates marathi on 9975327830