CEIR Tracking System: मोबाईल चोरीला गेला आता घाबरु नका...

मोबाईल शोधणारी यंत्रणा कशी काम करते माहितीये का? यासाठी केंद्र सरकार नवीन यंत्रणा सुरू करणार आहे.

updated:2023-05-15 15:14:37

...

CEIR Tracking System:  तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर काय करणार?  चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी केंद्र सरकारने नवी यंत्रणा तयार केली आहे. त्याचे नाव सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) आहे. ही सिस्टीम १७ मे रोजी लाँच होणार आहे. याद्वारे लोक त्यांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल ट्रेस किंवा ब्लॉक करू शकतील.

CEIR म्हणजे नेमकी काय?

CEIR हे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यासाठी एक सिटीजन पोर्टल आहे. हे सर्व टेलीकॉम ऑपरेटरच्या नेटवर्कमध्ये हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल फोन ब्लॉक करण्याची सुविधा देते, जेणेकरून ते वापरले जाऊ शकत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केलेला मोबाईल फोन वापरण्याचा प्रयत्न केला तर तो ट्रेस केला जाऊ शकतो. मोबाईल फोन सापडल्यानंतर तो पोर्टलवर अनब्लॉक केला जाऊ शकतो जेणेकरून त्या फोनचा मालक त्याचा वापर करू शकेल.

ही सिस्टीम कशी कार्य करते?

ही सिस्टीम इन-बिल्ट मैकेनिज्मसह सुसज्ज आहे, जी सर्व टेलीकॉम नेटवर्कवर क्लोन केलेले मोबाइल फोन ओळखण्यात मदत करते.

हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन कसा ब्लॉक करायचा?

  •  पोलिसांकडे तक्रार दाखल करा आणि अहवालाची प्रत ठेवा.
  •  तुमच्या टेलीकॉम ऑपरेटरकडून हरवलेल्या नंबरसाठी डुप्लिकेट सिम कार्ड घ्या(उदा., Airtel, Jio, Voda/Idea, BSNL, MTNL इ.). हे आवश्यक आहे कारण IMEI ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट सबमिट करताना प्राथमिक मोबाइल नंबरवर OTP पाठवला जाईल.
  •  पोलिस अहवालाची प्रत आणि ओळखपत्राची प्रत सोबत ठेवा. तुम्ही मोबाईल फोन खरेदी केल्याची पावती देखील सादर करू शकता.
  •  यानंतर, CEIR वेबसाइटवर जा आणि IMEI ब्लॉक करण्यासाठी नोंदणी फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
  •  फॉर्म सबमिट केल्यानंतर रिक्वेस्ट आयडी दिला जाईल. तुमच्या विनंतीची स्थिती तपासण्यासाठी आणि फोन प्राप्त झाल्यानंतर IMEI अनब्लॉक करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

IMEI ब्लॉक केल्यानंतर काय होते?

  •  IMEI ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट केल्यानंतर २४ तासांच्या आत मोबाइल फोन ब्लॉक होतो. मोबाईल फोन ब्लॉक केल्यानंतर तो संपूर्ण देशात कुठेही वापरता येणार नाही.

ते कधी अनब्लॉक केले पाहिजे?

  • वापरकर्त्याने त्याचा फोन आल्यावरच त्याच्या फोनचा IMEI अनब्लॉक करावा.

अनब्लॉक करण्याची पद्धत काय आहे?

  • CEIR च्या वेबसाइटवर जाऊन IMEI अनब्लॉक करण्याची रिक्वेस्ट करावी लागेल. यासाठी नोंदणी फॉर्म भरावा लागेल.
  • रिक्वेस्ट आयडी, मोबाइल नंबर आणि अनब्लॉक करण्याचे कारण नमूद करून सबमिट करा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर IMEI अनब्लॉक केला जाईल. जर एखाद्या वापरकर्त्याने पोलिसांकडे ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट केली असेल, तर त्यांना पोलिसांशी संपर्क साधावा लागेल.

लवकरात लवकर आपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

JOIN WHATSAPP GROUP massage Updates marathi on 9975327830

Popular

Technology: