Adah Sharma : केरळ स्टोरीची हिरोईन अदा शर्माचा अपघात

केरळ स्टोरीची पूर्ण टीम सुखरुप आहे. चाहत्यांचे मेसेज आमच्यापर्यत पोहचले. त्यांनी काळजी व्यक्त केली.

updated:2023-05-15 07:40:45

...

The Kerala Story Actress Adah Sharma: द केरळ स्टोरी चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्माच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तीचा अपघात झाला आहे. तिनं यासंबंधी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करुन त्यासंबंधीची अधिक माहिती दिली आहे. केरळ स्टोरी चित्रपटाची टीम एका कार्यक्रमासाठी निघाली असताना हा अपघात झाला अशी माहिती आहे.

 हिंदू एकता यात्रेत सहभागी होण्यासाठी हे कलाकार जाणार होते. मात्र रस्त्यात कलाकारांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या ट्विटमध्ये ती म्हणते की, मित्रांनो मी सुखरुप आहे. माझी काळजी करु नका. त्या अपघाताच्या बातमीचे वृत्त सगळीकडे वाऱ्यासारखे पसरले आहे.त्यातून नको त्या गोष्टी पसरु नये यासाठी आपल्याशी बोलते आहे. 

तिने केलेलं ट्वीट 

I am fine guys . Getting a lot of messages because of the news circulating about our accident. The whole team ,all of us are fine, nothing serious , nothing major but thank you for the concern

केरळ स्टोरीची पूर्ण टीम सुखरुप आहे. चाहत्यांचे मेसेज आमच्यापर्यत पोहचले. त्यांनी काळजी व्यक्त केली. त्यांना मोठा धक्का बसल्याचेही आम्हाला कळले. त्यानंतर आमच्या टीममधील सहकाऱ्यांनी तातडीनं सोशल मीडियावर त्याविषयी अपडेट्स देण्यास सुरुवात केली असल्याचे तिने म्हटले आहे. हा अपघात कसा घडला याविषयीची माहिती अजूनपर्यत समोर आलेली नाही अजून पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये द केरळ स्टोरीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. दहा दिवसांत या चित्रपटानं शंभर कोटीपेक्षा जास्त कमाई केल्याची आकडेवारी समोर आली आहे. परदेशातही हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अदा शर्मानं केलेल्या भूमिकेचे चाहत्यांनी, प्रेक्षकांनी कौतूक केले आहे.

केरळ स्टोरीपासून लोकप्रिय झालेल्य अदा आणि तिच्या सहकाऱ्यांच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर अदानं ट्विट करुन त्यासंबंधीची माहिती देऊन चाहत्यांना दिलासा दिला आहे.

लवकरात लवकर आपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

JOIN WHATSAPP GROUP massage Updates marathi on 9975327830

Popular

Technology: