Wi-Fi speed : Wi-Fi चं स्पीड सारखंच गंडतंय का?

Wi-Fi च्या राऊटर ची काय काळजी घ्यावी

updated:2023-05-15 07:16:52

...

Wi-Fi speed : आजकाल ऑफीसमध्येच नाही तर  घराघरात WiFi बसवले जाते. घरातील मोबाईल वापरणाऱ्या सदस्यांची संख्या इतकी असते की वैयक्तिक इंटरनेट पॅक वापरण्यापेक्षा WiFi वापरणं सोप्प असतं.  घरी WiFi असेल तर बऱ्याचदा त्याचे स्पीड कमी होते.

WiFi चे स्पीड कमी असेल तर आपण कनेक्शन, नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून ते चेक करतो. पण, तुमच्या WiFi चे नेट स्पीड कमी होण्यास तुमचे शेजारी, मित्र कारणीभूत ठरू शकतात. ते कसे हे आज आपण पाहुयात.

तुमचे शेजारी, मित्र तुमचा वाय-फाय दुसरा कोणी वापरत असेल आणि यामुळे तुमचा स्पीड कमी होऊ शकतो. अनेकदा आजूबाजूला राहणारे म्हणजे शेजारी करतात.

जर तुमचा इंटरनेट स्पीड कमी असेल तर तुमचे इंटरनेट कोण वापरत आहे हे वेळोवेळी तपासून पाहावे. तसेच, आपण आपला वाय-फाय पासवर्ड नेहमीच सुरक्षित ठेवला पाहिजे. तसेच, फक्त आपले डिव्हाइस त्याला कनेक्ट केले पाहिजे.

Wi-Fi च्या राऊटर ची काय काळजी घ्यावी

  • राउटर उंच ठेवा:  राउटरमध्ये त्यांचे सिग्नल खाली पसरवण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे कव्हरेज वाढवण्यासाठी राउटर शक्य तितक्या उंच माउंट करणे चांगले.
  • लेक्ट्रॉनिक उपकरणे नसावी: उत्तम राउटर स्पीड हवा असल्यास एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवणे आवश्यक आहे. राउटर कायम इलेक्ट्रॉनिक्स आणि मोठ्या धातूच्या वस्तूंपासून दूर असलेले स्थान निवडण्याचा प्रयत्न करा.
  • Wi-Fi Booster : सर्वत्र वाय-फाय सिग्नल देण्यासाठी राउटर आणि डेड झोन दरम्यान वाय-फाय बूस्टर ठेवा.
  • वाय-फाय सिग्नल Appवापरा: Android Users वायफाय विश्लेषक अॅपद्वारे वाय-फाय सिग्नल तपासू शकतात
  • लवकरात लवकर आपडेटसाठी 

    JOIN TELEGRAM CHANNEL

    JOIN WHATSAPP GROUP massage Updates marathi on 9975327830

Popular

Technology: