एलॉन मस्क देणार ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा. सहा आठवड्यात स्वीकारणार पदभार...
updated:2023-05-13 07:21:05
Twiiter update: एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडण्याची घोषणा केली असून त्यांनी या पदासाठी एका महिलेची निवड केली आहे. मस्क यांनी अद्याप नव्या सीईओचं नाव घोषित केलं नसलं तरी नवीन सीईओ म्हणून Linda Yaccarino येत्या सहा आठवड्यांत पदभार स्वीकारतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
ते म्हणाले, ट्विटरसाठी नव्या सीईओंची निवड केल्याचं जाहीर करताना मला आनंद होत आहे. ट्वीटरचे नवीन सीईओ येत्या सहा आठवड्यांत पदभार स्वीकारतील. राजीनामा दिल्यानंतर मी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी तसेच सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमचं काम पाहीन”
Excited to announce that I have hired a new CEO for X/Twitter. She will be starting in 6 weeks! My role will transition to being exec chair & CTO, overseeing product, software & sysops.
एलॉन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये ट्विटर विकत घेतलं, तेव्हापासून ते त्याचे CEO म्हणून काम पाहत आहेत. ट्विटरला कायमस्वरूपी सीईओ नाही. नवे सीईओ आल्यानंतर माझी भूमिका बदलेल. मला कोणत्याही कंपनीचे सीईओ व्हायचं नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, एलॉन मस्क यांनी यासंदर्भात १९ डिसेंबर रोजी ट्विटरवर पोल सुरू केला होता. “मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हायला हवं का? या पोलचा येणारा निकाल मला मान्य असेल, मी तो पाळेन”, असं मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: