फ्री मध्ये बनवा लग्नपत्रिका, शुभेच्छा पत्र...
updated:2023-05-13 06:53:41
Photo Editing and Designing: आज सर्वजण मोबाईल आणि इंटरनेट चा वापर करतात. त्याच बरोबर वेगवेगळ्या सोशल मिडिया चा वापर करतात. एखाद्या कार्यक्रमाची पत्रिका किंवा वाढदिवसाचे शुभेच्छा पत्र बनवून घ्यायचे असेल तर खूप किंमत मोजावी लागते. दुसऱ्याकडून पैसे देऊन हे कार्ड बनवून घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये अगदी सोप्या पद्धतीने व मोफत बनवू शकता.
त्यासाठी हे Apps मोबाईल मध्ये करा डाउनलोड
Pixellab या app चा वापर करून सुरेख Photo Editing and Designing करता येते. हे अगदी मोफत app आहे. Google Play Store वरून मोबाईल मध्ये डाउनलोड करता येते. यात आपल्याला पाहिजे ती फोटो साईज निवडता येते. वेगवेगळे Fonts, वेगवेगळे फोटो एकत्र करणे, पाहिजे त्या रंगमध्ये अक्षरे, वेगवगळे background अश्या अनेक गोष्टी आपण यात अगदी मोफत करू शकतो. अर्धवट झालेले काम सेव्ह करून ठेवता येते व पुन्हा पाहिजे असेल तेव्हा पूर्ण करता येते.
Indian font converter या app चा वापर वेगवेगळ्या मराठी fonts च्या वापरासाठी होतो.
तुम्ही youtube वर पाहून वेगवेगळ्या आधीच तयार केलेले design डाउनलोड करू शकता. नंतर त्या file Pixellab app मध्ये उघडून पाहिजे तश्या प्रकारे एडीट करू शकता. जर तुम्हाला लग्नपत्रिका बनवायची असेल तर youtube search करा लग्नपत्रिका plp file तुम्हाला हव्या असलेल्या video वर क्लिक करून त्याच्या description मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन plp file डाउनलोड करा.
लवकरात लवकर आपडेटसाठी
JOIN WHATSAPP GROUP massage “Updates marathi” on 9975327830
Popular
Sports:
Technology:
Job Alert: