लॅपटॉप वापराताना काळजी घ्या नाहीतर…

सावधान! लॅपटॉप चुकीच्या पद्धतीने वापरल्यास तो आरोग्यासाठी धोकादायक हानिकारक ठरू शकतो. घरामध्ये लॅपटॉप वापरताना कोणती काळजी घ्यावी...

updated:2023-05-12 04:07:55

...

Health : अंधारात वापर नको

अंधारात लॅपटॉप स्क्रीनच्या उजेडात काम करणे टाळा. लॅपटॉपमधून निघणारा प्रकाश जास्त वेळ थेट डोळ्यावर पडल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो. मंद उजेडात किंवा पूर्ण उजेडातच लॅपटॉप वापरलेला योग्य त्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही.

याशिवाय लॅपटॉपच्या आजूबाजूला खाण्यापिण्याचे पदार्थ न ठेवणे, लॅपटॉपला कि बोर्ड किंवा माऊस लावून तो डेक्सटॉप पीसीसारखा वापरणे, चार्जींगवरून काढताना डायरेक्ट वायर न खेचता योग्य पद्धतीने ती काढणे, जास्त वेळ काम करत असल्याचे लॅपटॉप स्क्रीनमुळे डोळ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे यासारख्या गोष्टीं करून लॅपटॉपचा वापर आरोग्यासाठी घातक होणार नाही याबद्दल काळजी घेणे फायद्याचे ठरते.

जास्त वाकू नका

लॅपटॉप वर काम करत असताना सतत मान खाली घालून काम केल्याने मानेचा किंवा पाठीचा कणा दुखण्याचा त्रास होतो. यासाठी उपाय म्हणून लॅपटॉपची स्क्रीन अॅडजेस्ट करणे किंवा टेबलवर लॅपटॉप ठेऊन काम करणार असला तर लॅपटॉप आणि तुमची बसण्याची जागा समपातळीत असेल याची काळजी घेणे जेणेकरून वाकावे लागणार नाही. खुर्चीवर बसताना पाठीमागे उशी घेणे, खुर्ची टेबल जवळ ठेऊन ९० अंशात हात येतील अशा पद्धतीने ताठ बसून काम करणे योग्य ठरते.

चार्जिंग सुरु असताना काम नको

कोणत्याही डिजीटल वस्तुला चार्ज करत असताना त्याचा वापर टाळावा. लॅपटॉपवर चार्जिंग सुरु असताना काम करणे अनेक अर्थाने धोकादायक ठरू शकते. अगदी शॉक लागण्यापासून ते छोटा स्फोट होण्यापर्यंत काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच चार्जिंगची पीन काढल्यानंतरच लॅपटॉपचा वापर करावा. चार्जिंग करताना लॅपटॉप टेबलवर किंवा सपाट पृष्ठभागावरच ठेवावा.

Popular

Technology: