कशाप्रकारे चालतात हे apps. लहान मुलांपासून लांब ठेवा...
updated:2023-05-11 14:55:17
Technology : आजकाल सर्रास सर्वजण मोबाईल व इंटरनेटचा वापर करत असतात. अगदी लहान मुलांपासून तर वडिलधाऱ्यापर्यंत सर्वाकडे मोबाईल मधून डोक वर काढण्यासाठी वेळ नसतो. ज्याप्रमाणे सर्वजण मोबाईल आणि इंटरनेटचे फायदे सांगतात त्याचप्रमाणे त्याचे तोटे देखील तेवढेच आहेत. त्याचे परिणाम मात्र खूप भयानक स्वरुपात अनुभवायला मिळतात. जेवढे काही सोशल मिडिया apps आहेत त्याचा तर वापर अगदी सावधानपणे करणे अतिशय गरजेचे आहे.
एखाद्या व्यक्तीने कोणत्याही एका सोशल मिडिया platform वर आपले खाते तयार केले तर ती व्यक्ती आपली सर्व माहिती त्यावर टाकते. अगदी मोबाईल नंबर पासून ते नाव, जन्मतारीख, इत्यादी गोष्टी. या सर्व गोष्टींचा दुरुपयोग होऊ शकतो. त्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे महत्वाचे आहे. वेगवेगळे फोटो, लोकेशन आपण शेअर करत असतो. यामुळे आपण यावेळी कुठे आहोत. याची माहिती कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला माहिती होते. या माहितीचा वापर करून आपल्यावर नजर ठेवली जाऊ शकते.
जर तुमचे गुगल चे खाते असेल तर त्याचा पासवर्ड कोणालाही सांगू नका. आपले वैयक्तिक डिवाईस सोडून दुसऱ्या कोणत्याही डिवाईस मध्ये लॉगीन करू नका. या खात्यामुळे संपूर्ण तुमच्या मोबाईलचा अक्सेस दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो. ती व्यक्ती तुमच्या मोबईल मधील सर्व गोष्टी तुमच्या परवानगीविना हाताळू शकते. तुमचे लोकेशन, मोबाईल मधील फोटो, मेसेज, contacts ई. सर्वाची माहिती चोरी होऊ शकते.
फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब यांसारखे apps जो वापरकर्ता आहे त्याच्या आवडीनुसार वेगवेगळी माहिती दाखवत असतात. यात वापरकर्त्याची आवड म्हणजे तो जे काही सर्च करत असतो व जे काही त्या platform वर पाहत असतो त्याचाशी संबंधित माहिती दाखवत असतो. हे apps चालू केल्यावर वेळ कसा निघून जातो हे पण कळत नाही. कधी कधी नको असलेल्या गोष्टी दिसत असतात. याचा परिणाम लहान मुलावर होत असतो.
एकदा का त्या गोष्टी येत राहिल्या कि परत त्याच्याशी संबधित गोष्टी अजून पुढे येत जातात. यातून वेळ वाया जातो. मानसिक ताण येतो.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: