दिग्दर्शक ओम राऊत यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित आदिपुरुष या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे.
updated:2023-05-11 08:46:51
Movies updates: मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांच्या बहुप्रतिक्षित आदिपुरुष या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेचे पात्र साकारत आहे तर अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे.
हैदराबादमध्ये आदिपुरुष या चित्रपटाच्या ट्रेलरचे खास स्क्रीनिंग करण्यात आले होते. त्यानंतर आता प्रेक्षकांसाठी या चित्रपटाचा ट्रेलर youtube सारख्या सर्व platform वर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरच्या सुरुवातीला हनुमान हा गुहेत तपश्चर्या करत असल्याचे दिसत आहे. श्रीराम, लक्ष्मण हे सीतेसह वनवासात जातात. राम आणि लक्ष्मण शबरीने दिलेली उष्टी बोरे खाताना दिसत आहेत तसेच लक्ष्मणाची प्रकृती ठीक व्हावी यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणताना ते राम-लक्ष्मण वानरसेनेसह रामसेतूवरून लंकेला जाताना सर्व गोष्टींची अतिशय मनमोहक झलक यात दाखवण्यात आली आहे.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: