Movies : बहुचर्चित सिनेमा घर बंदूक बिर्याणी ठरतोय वरचढ येणार पार्ट - 2

नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत. मराठीतला धमाकेदार सिनेमा...

updated:2023-04-12 11:13:44

...

Movie : नागराज मंजुळे यांचा क्रिएटीव डायरेक्टर असलेला घर बंदुक बिर्याणी हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील मुख्य भूमिकेत आहेत.  तसेच आटपाट सोबत या आधी चित्रपटात काम केलेले कलाकारही यात आहेत. हा अॅक्शन ड्रामा चित्रपट सुमारे 2 तास 41 मिनिटांचा आहे. या चित्रपटाला भारतीय सेन्सॉर बोर्डाने UA प्रमाणपत्र दिले आहे.

घर बंदुक बिर्याणी या चित्रपटाची कथा आकाश ठोसर उर्फ राजू याच्या भोवती फिरताना दिसते. त्याच्या मागचे काय गुपित आहे ते नक्की जाऊन पाहा.

सयाजी शिंदे उर्फ पल्लम यांच्या नेतृत्वाखाली एक डोकाईट ग्रुप आहे. त्यांची काय अडचण आहे व राजूचा त्यांच्या सोबत काय सबंध हे हि जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल. 

या चित्रपटातील तिसरे मुख्य पात्र म्हणजे नागराज मंजुळे उर्फ पोलीस निरीक्षक राया पाटील. त्याला पल्लमला संपवायचे असते. पल्लम, राया पाटील आणि राजू आमनेसामने आल्यावर काय होईल? यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

घर बंदुक बिर्याणी या चित्रपटाची कथा नागराज मंजुळे आणि हेमंत आवताडे यांनी लिहिली आहे. चित्रपटाच्या फर्स्ट हाफमध्ये डार्क कॉमेडीने आहे, पण दुसरा हाफ अॅक्शन आणि थोडा गंभीर आहे. कथा छान लिहिली आहे आणि संवादांनी कथा आणखी समृद्ध केली आहे. हा चित्रपट सुमारे 2 तास 40 मिनिटांचा आहे.

 

चित्रपटातील गाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस आली आहेत. 

  1. गुण गुण 
  2. अहा हेरो 
  3. हान कि बडीव 
  4. मारिया

चित्रपटाच्या शेवटी भाग  2 येणार आहे असं दाखवले आहे. भाग 2 ची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना असेल.

लवकरात लवकर अपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

WHATSAPP GROUP  ला  JOIN होण्यासाठी  9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.

Popular

Technology: