मानवी शरीराला लागणारे इंधन म्हणजे अन्न हे अन्न निर्मिती शेती मधूनच होत असते.
updated:2023-03-25 10:09:13
मानवी शरीराला लागणारे इंधन म्हणजे अन्न हे अन्न निर्मिती शेती मधूनच होत असते. म्हणून कितीही काही केलं तरी शेती केल्याशिवाय पर्याय नाही. कलियुगात शेती कोणी कराया मागत नाही सगळे नोकरीसाठी धडपडत आहेत मग शेती कोण करणार अन जे शेती करतात त्यांना कमी लेखता. नोकऱ्या करून पैसे कमवणार पण पैसे तर डायरेक्ट खाऊ शकत तर नाही ना मग कमवलेला पैसा घेऊन शेवटी शेतमाल खरेदी करण्यासाठी वापरला जातो अन् मग आपल्या पोटाची खळगी भरली जाते मग शेती पण करायची लाज कसली कितीही काही झालं तरी शेती केल्याशिवाय आपल्याला अन्न हे भेटू शकत नाही ते कुढल्या फॅक्टरीत तयार शकत नाही त्यामुळे शेती करणे ही काळाची गरज आहे. जो शेती करेल तोच पुढे जाईल ही कळ्या दगडावरची रेघ आहे भविष्यात सगळ बंद पडेल पण शेती बंद पडू शकत नाही पोटासाठी अन्न हे शेतीच देऊ शकते त्यामुळे आज ज्यांनी शेतीकडे पाट फिरवली आहे त्यांना भविष्यात शेतीच किंमत काय ते कळेल म्हणून शेती आहे तर आपण आहे जर शेती करणे पूर्णपणे बंद केली तर काय होईल हे एकदा विचार करून बगा त्यामुळे मानवाने कितीही प्रगती करु दे शेवटी शेती हीच अन्न पुरवणार आहे त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष करू नका शेती करा रासायनिक खतांचा वापर टाळा सेंद्रिय शेती करा त्यामुळे आरोग्य चांगले राहील भविष्यात शेतीकडे सगळ्यांचा कल वळणार आहे पैसे सगळ काही नसत ते फक्त एक चलन आहे पण शेती सगळ काही आहे पूर्वीच्या काळात पैसे बगाया सुधा भेटत नव्हते पण शेती होती तर सगळे चालत होत देणं घेणं सुधा धान्यावर चालत असे म्हणंजे पैश्या मुळे काही अडत नव्हत भविष्यात अस घडू शकत ज्याच्याकडे शेती तो श्रीमंत असेल जय किसान जय जवान.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: