Maharashtra Kesari : पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

सांगलीत करण्यात आलं स्पर्धेचे नियोजन

updated:2023-03-20 10:44:32

...

Maharashtra Kesari : या वर्षी महाराष्ट्रात पुरुष महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेप्रमाणे महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मैदानात रंगणार आहे. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रातील सांगली येथे करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निर्णयानुसार 23 आणि 24 मार्च रोजी या स्पर्धा सांगली येथे पार पडणार आहेत असे जाहीर करण्यात आले. सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने या स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. 

या स्पर्धेत एकूण दहा वजनी गटातील व खुल्या गटातील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. त्यानुसार 50,53, 55, 57,59,62,68,72 व 76 या वजनी गटातील कुस्तीपटू सहभागी होतील. ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार असून 65 वजनी गटावरील मल्ल खिताबासाठी लढणार आहेत.

महिला विजयी कुस्तीगीरास केसरी खिताब व चांदीची गदा देऊन गौरीवण्यात येईल. स्पर्धेच पहिलच वर्ष असल्यामुळे खिताब जिंकणाऱ्या महिला पहिलवानाची इतिहासात नोंद होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लवकरात लवकर अपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

WHATSAPP GROUP  ला  JOIN होण्यासाठी  9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.

Popular

Technology: