गांधीजींच्या जिवनासबंधी काही महत्वाच्या बाबी तुम्हाला माहीत आहेत का?

अनेक ग्रंथ, धर्म, संप्रदाय यांच्यामधून त्यांनी काही विचार प्रेरणा व तत्त्वे आत्मसात केली होती.

updated:2023-03-14 02:41:41

...

गांधीजींच्या व्यतिमत्वावर कोणतीही परंपरा व संप्रदाय, धर्मग्रंथ व धर्मगुरू यांची एकसुरी छाप दिसत नाही. अनेक ग्रंथ, धर्म, संप्रदाय यांच्यामधून त्यांनी काही विचार प्रेरणा व तत्त्वे आत्मसात केली होती. त्यांचा व्यतिमत्वावर प्रभाव दिसून येतो.
गांधीजीनी एकूण १४९१ दिवस (सुमारे ५ वर्षे) तुरुंगवास भोगले. त्यापैकी ११४ दिवस ते दक्षिण आफ्रिकेत तुरुंगात होते. गांधीजीनी त्यांचे आत्मचरित्र "माये सत्याचे प्रयोग" गुजराती भाषेत लिहिले. त्याचे इंग्रजी भाषांतर त्यांचे सचिव महादेवभाई देसाई यांनी केले.
गांधीजीवर ९०,००० पुरतके लिहिली गेली आहेत. पाकिस्तान, इराण, ब्रिटनसह १०० पेक्षा अधिक देशांत गांधीजीचे पुतळे आहेत.
१५० देेशातील ८०० पोस्टाच्या तिकीटावर गांधीजीचे चित्र आहे. 
गांधीजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात (१९६९) चलनी नोटेवर प्रथम दिसले. 
१९९६ पासून एक व दोन रुपये वगळता सर्व नोटांवर गांधीजीची प्रतिमा छापण्यात आली.
गांधीजीवर ४५ चित्रपट व ५०० डाक्युमेंटरी तयार करण्यात आल्या.
mkgandhi.org ही साईट रोज २०० देशांतील ८००० लोक पाहतात.
भारतातील ७१९ जिल्हात गांधीजीच्या नावाने रस्ते, शाळा व उद्याने आहेत.
१९ वर्षापर्यंत ते "मोहन" म्हणून ओळखले जात.
२४ व्या वर्षी द. आफ्रिकेत त्यांना "मि. गांधी" ही ओळख प्राप्त झाली.
४८ व्या वर्षी चंपारण्यमध्ये प्रथम "बापू" असे संवोधले.
५० व्या वर्षी रविंद्रनाथ टागोरांनी त्यांचा उल्लेख "महात्मा" असा केला.
गांधीजी जेव्हा ७४ वर्षाचे होते तेव्हा नेताजी बोस यांनी रेडिओ संदेशात गांधीजीना "राष्ट्रपिता" म्हटले गांधी हत्येनंतर परदेशातून ३४४१ शोकसंदेश आले होते जगातील ६०० हन अधिक विद्यापीठात गांधी अध्ययन केंद्रे चालविली जातात. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय व सर्वधर्म समभावावर आधारित एक नवीन मानवी संस्कृती निर्माण व्हावी यासाठी हा महात्मा जगला आणि त्यासाठी जाणीवपूर्वक बलिदानही दिले.
याहू डॉट कॉमवर गांधीजीच्या संबंधी १ कोटी १० लाखांपेक्षा जास्त नोंदी आहेत तर गुगलवर गांधीजींच्या ६५ लक्ष नोंदी आहेत.
आज जगात दररोज नवीन ५ ते ६ पुस्तके गांधीजींवर प्रकाशित होत असतात.
जगात शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त केलेले दलाई लामा, आंग सा सू-की, नेल्सन मंडेला, डॉ. मुहंमद युनूस, बराक ओबामा, युसूफझाई मलाला, कैलास सत्यार्थी हे सर्व नेते मान्य करतात की, गांधीजींच्या प्रेरणेनेच ते नोबेल शांतता पुराकाराचे मानकरी ठरले.
गांधीजींचे समग्र वाड्:मय भारत सरकारने १८५८ ते १९९४ या काळात ९० खंडात प्रकाशित केले आहे.
गांधीजीच्या विचारांना विरोध करणारे असंख्य विचारवंत होते. त्यात त्यांचे काही सहकारी व अनुयायीपण होते. गांधीजी त्यांना आलेल्या प्रत्येक पत्राचे सविस्तर उत्तर देत असत.
गांधीजींचे अनेक प्रस्ताव आणि मते काँग्रेसने नाकरली होती. काँग्रेस पक्ष संघटनेत त्यांना कोणतेही पद नव्हते. पण त्यांचा शब्द अंतिम होता.

Popular

Technology: