मुद्रण व वृत्तपत्रे press

मुद्रणामुळे मानवी संस्कृतीमध्ये ज्ञानाचे, ऐश्र्याचे, लोकशाहीचे व मानवतेथे एक अपूर्व असे सुवर्णयुगच सूरू झाले.

updated:2023-02-27 07:56:22

...

      प्रास्ताविक : मुद्रणकलेचा शोध इ.स. १४३९ मध्ये गटेनवर्ग याने लावला मुद्रणामुळे मानवी संस्कृतीमध्ये ज्ञानाचे, ऐश्र्याचे, लोकशाहीचे व मानवतेथे एक अपूर्व असे सुवर्णयुगच सूरू झाले. भारतात मुद्रणाची सुरुवात गोव्यात झाली. त्यानंतर भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यावरील शहरांतून मद्रणाचा फैलाव झाला.
     भारतात मुद्रणकला व वृत्तपत्रे यांचा प्रारंभ बि्रटिशांच्या राजवटीत झाला. भारताप्रमाणेच मुंबई प्रांतातील वृत्तपत्रनी अत्यंत प्रतिकृल परिस्थितीत वाटचाल केली आहे. १९ व्या शतकात जी सामाजिक व सांस्कृतिक आंदोलने उदयास आली त्यामागे मख्य प्रेरणा तत्वालीन वतपत्रांचीच होती. इ.स. १८३१ मध्ये मुंबईत स्थापन झालेला गणपत कृष्णाजी कारखाना हा महाराष्ट्रीयन व्यक्तीने स्थापन केलेला आद्य छापखाना होय.
     Times of India हे पत्र Bombay Times. Standand व टेलिग्राप एकत्रीकरण होऊन सुरू करण्यात आले होते. पण इंग्रजी भाषेचा फारसा प्रचार नसल्यान त्याचा जनतेवर विशेष परिणाम झाला नाही. टाइम्स ऑफ इंडिया, पायोनिअर एशियन पत्रांचे अंडव्होकेट ऑफ इंडिया, स्टेटसमन ही सर्व सरकार धार्जिनी अग्लो इंडियन पत्रे होती मुंबई हे शहर ब्रिटिश साम्राज्याचे एक महत्वाचे सांस्कृतिक तसेच व्यापारी केंद्र असल्याने तेथून इंग्रजीतील पत्रे निघणे साहजिकच होते. खिश्नन धर्मप्रसाराचे केंद्र, शैक्षणिक उपक्रमाचे केंद्र हे मुंबई शहरच होते. त्यामुळे मुंबईत मराठी वृत्तपत्र सुरू होण्यापूर्वीच इ.स.१७८९ ला Bombav Herold से इंजी पत्र सुरू झाले यावेळी पणे ही पेशव्यांची राजधानी होती. मुंबई व पुणे या शहरांची स्थिती तेव्हा एकदम भिन्न होती. पुणे शहरावर तेव्हा जुन्या कल्पनांचा पगडा होता. इंग्रजी जाणणारे तेव्हा पुण्यात हजार-पाचशेही नसतील. पुण्यातून इंग्रजी पत्र सुरू होण्याचा तेव्हा तरी मुळीच प्रश्न होता. केसरी, मराठा, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनिअन, महाराष्ट्र मित्र, अरुणोदय, सुर्योदय, पुणे वैभव, प्रभाकर, या वृत्तपत्रांचे संपादन ब्राम्हणच होते. काळ या पत्राचे संपादक शि. म. परांजपे ब्राम्हणच होते. 
     इ.स.१८२८ साली लॉर्ड बेंटिंग हा ग.ज. या पदावर आला. तो उदारमतवादी पुरोगामी विचारांचा परस्कर्ता होता. तो वत्तपत्र स्वातंत्र्याचा परस्कर्ता होता वर्तमानपत्राच्या प्रसारामुळे देशातील अज्ञान दर होईल असे त्याला वाटे. देशी भाषेतील वृत्तपत्रांपासून ब्रिटिश सतेला धोका होईल ही भीती निरर्थक आहे असे त्याचे मत होते.
     सर चार्लस मेटकाफही वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता होता. त्याच्याच काळात वृत्तपत्रांना स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. तो भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तीदाता होता. बिटीशांच्या सुरक्षेतेला बाघा येणार नाही इपर्यतत्रावे या मताचा तो होता भारतातील सर्व प्रांतांत वृत्तपत्र निर्बंधबाबत समानता असावी या मताचा तो होता  इ.स.१८३६-५६ या काळात वृत्तपत्रांना चांगलेच स्वातंत्र्य होते.
     एकंदरीत १९ व्या शतकातील प्रारंभीच्या मराठी वृत्तपत्रांनी समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले. सर्वच सामाजिक प्रश्न. स्रीयांचे प्रश्न या वृत्तपत्रांनी मांडले मराठी वृत्तपत्रच्या कामगिरीमुळे समाजात नव्या शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय जाणिवांचा विकास झाला या वत्तपत्रांनी लोकशिक्षणाची भमिका बजावली. १९ व्या शतकात दर्पण, प्रभाकर ज्ञानप्रकाश, इंदप्रकाश, शतपत्रे या पत्रानी सांस्कतिक जागरणाचे कार्य केले. या वृत्तपत्रन समाजातील श्रमक कल्पना अंघश्रद्धा यांना हादरे दिल्याने समाजात वर्तनबदलाची प्रकिया सुरू होऊन सामाजिक चळवळीला गती मिळाली. महाराष्ट्राची शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक विचारांची घडण होण्यास वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची ठरल. जागृतीचे नवे पर्व सुरू झाले. महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य आंदोलनाचा उदय व विकासात गौरवशाली भूमिका बजावली. इ.स. १९०८ मध्ये राष्ट्रमत हे दैनिक मुंबईतून सुरू झाले. केशवसुतांचे भाऊ सीताराम केशव दामले हे या पत्राचे पहिले संपादक होते.

Popular

Technology: