सावित्रीबाई फुले (इ.स. १८३१-९८९७)

आदर्श पत्नी शिक्षीका समाजसेविका कवयित्री अशी सावित्रीबाईची ओळख आहे

updated:2023-02-24 10:51:50

...

      आदर्श पत्नी शिक्षीका समाजसेविका कवयित्री अशी सावित्रीबाईची ओळख आहे सावित्रीबाई फले यांच्यावर मागील २५ वर्षात छोटीमोठी ४० पुस्तके लिहिली गेली आहेत त्यासंबंधीची ग्रंथयादी प्रा. जी. ए. उगिले यांच्या सावित्रीवाई फुले या छोट्या ग्रंचात दिली आहे परंतु सत्यशोधक चळवळीचे एक अभ्यासक डॉ. हरी नरके म्हणतात या सर्व ग्रंथांत जवळपास तीच तीच माहिती दिलेली आहे. या ४० ग्रंथांपैकी कोणत्याही लेखकाने सावित्रीवाईच्या जीवनकार्याची वस्तुनिष्ठ चिकित्सा केलेली नाही  काही अपवाद वगळता त्यांचे मत खरे आहे
     सावित्रीबाईचा जन्म इ.स. १८३१ चा. खंजी नेवसे पाटील हे त्यांच्या वडिल नाव, ते नायगाव खंडाळा पेट जिल्हात या खेडेगावचे पाटील होते. इ.स. १८४० मध्ये सावित्रीबाईचे लग्र जोतिरावांशी झाले. जोतिरावांचे पूर्वज सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुकयातील कडगुण गावचे गोरे फुलमाळी होते. लग्रानंतर सावित्रबाईनी मिसेस निचेल यांनी चालविलेल्या नॉर्मल स्कुलमध्ये शिक्षण घेतले. ३ ते ४ वर्षाचा कोर्स सावित्रीने पुर्ण केला, अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले.
१) शैक्षणिक कार्य 
१) नेटिव्ह फिमेल स्कूल्स, पुणे. 
२) The Society For Promotine th Education of Mahars, Mangas and Extras.
     या संस्थेच्या वतीनेच त्यांनी आपले शैक्षणिक कार्य हाती घेतले. या संस्थांची आर्थिक परस्थिती वाईट होती तरीही इ.स. १८४८ मध्ये म. फुले यांनी पुण्यात बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाडयात मूलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत तात्यासाहेब भिडे यांनी मोफत जागा, दरमहा ५ रुपये व प्रारंभिक खर्चासाठी १०१ रुपये देणगी दिली होती. याच शाळेत सावित्रीबाई शिक्षिका होत्या. या शाळेसाठी पालकांच्या भेटी घेऊन मुली मिळवण्याचे काम फुले पती पत्नीने केले. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा अंघश्रद्धा दूर करावयाच्या असतील तर प्रथम स्रीयांना शिक्षण दिले पाहिजे हा विचार त्या दोघांनी स्रीयांनसमोर ठेवला. पुण्यात त्यांनी मुलीनसाठी पहिली शाळा इ.स. १८४८ मध्ये काढली व त्याच वर्षी कार्ल मार्त्सने दास कॅपिटल हा ग्रंथ प्रकाशित केला होता. या दोन्ही घटना तेवाच क्रांतिकारक मानाव्या लागतील. इ.स.१८४८-१८५२ पर्यंत फुले पती पत्नीने पुणे शहर व सातारा परिसरात एकृण १८ शाळा काढल्या. फूले दांपत्याच्या या शैक्षणिक कार्यात विष्णुपंत थते, वामनराव खराडकर, सगुणाबाई क्षीरसागर, फातिमा शेख यांनी शिक्षक म्हणून काम करून सहकार्य केले. स्वतः सावित्रीबाईचे अध्यापनाचे कार्य सर्वच दृष्टया उठावदार व गुणवत्तापूर्ण होते. अत्यंत चिकाटीने जिद्दीने फुले पती-पत्नीने शिक्षणच कार्य केले. त्यच्या या कार्यास पुण्यातीस सनातनी वृत्तीच्या लोकांनी विरोध केला होता. त्यांच्या अंगावर चिखलफेक केली पण सावित्रीबाईने अत्यंत धैर्यानिे  जिद्धिने कळकळीने व कॉशल्याने शिक्षिका म्हणून काम चालूच ठेवले. तेव्हाचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ना. जॉन वॉर्डन यांनी इ.स. १८५१ मध्ये शाळेला भेट दिली तेव्हा त्यांनी म्हटले होते, जोतिबापेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तिच योग्यता काय सांगावी आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले व त्यांच्याबरोबर सह वाट्यास येईल त्या हालअपेष्टा भोगल्या. १६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुण्याच्या विश्रामबाग वाड्यासमोर ब्रिटिश सरकारने ३००० लोकांच्या उपस्थित फुले पती-पत्नीचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला होता. फूले पती-पत्नीने स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवले होते. दूरदूरच्या ठिकाणांहून मुले तेथे शिक्षणासाठी येत असत. १२ फेब्रुवारी १९५३ रोजी त्यांच्या शाळेतील मुलींची परीक्षा पुण्यातील सरदार व युरोपियन विद्वानांच्या उपस्थित झाली होती.
२) अस्पृश्यतेविरुद्ध कार्य 
सावित्रीबाईचे कार्य हे फक्त स्त्री शिक्षणापुरते मर्यादित नाही. स्त्री शिक्षणाबरोबरच अस्पृश्यतेविरुद्धही त्यांनी कार्य केले. इ.स.१८५१ मध्ये त्यांनी महार वस्तीत स्वतंत्र शाळा काढली. अस्पृश्यांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून अस्पश्यांसाठी खुला केला. तिने महिला स्वतंत्र शाळा आपल्या घरातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला. तिने सेवा मंडळ काढले होते व त्या स्वतः या मंडळाच्या सचिव होत्या. त्याच्या वतीने इ.स. १८५२ मध्ये पुण्याच्या कलेक्टरच्या पत्नी ई. सी. जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक तिळगुळ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमांच्या छापील पत्रिकेत म्हटले होते, १३/०१/१८५२ रोजी पुणे कलेक्टर साहेबांच्या पत्नी मिसेस जोन्स यांच्या आहे. तरी सर्व स्रीयांनी आपल्या  लेकी-सुना घेऊन यावे. समारंभ सायंकाळी ५ वाजता आहे. कोणत्याही जातीच्या अथवा धर्माच्या बायका आल्या तरी त्या एकत्र बसतील. जातिभेद व पक्षपात न करता सर्वाना सारखेच हळदी-कुंकू लावण्यात येईल आणि तिळगूळ वाटण्यात येईल. ही पत्रिकाच अस्पृश्यांबाबत सावित्रीबाईचा दृषि्टकोन स्पष्ट होण्यास पूरेशी आहे. सावित्रीबाईच्या प्रतिकेस प्रतिसाद देऊन सर्व जातींच्या स्रीया त्या कार्यक्रमास उपस्थित होत्या. या कार्यक्रमातून जातिअंताचा त्या जणू संदेश देतात.
३) स्त्रीमुक्तीचे कार्य महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून त्यांचा गौरव. स्त्री शिक्षणाशिवाय स्रीयांच्या उद्धाराचे मोठे कार्य सावित्रीबाईनी केले. पुनर्विवाहस बंदी असल्यामुळे तरुण विधवा कोणाच्या तरी वासनेला बळी पडत व गरोदर राहत व त्यांच्याकडून नवजात बालकांची हत्या होई. अशी टाकून दिलेली मृत नवजात बालके जोतिराव व सावित्रीबाईनी पाहिली होती. म्हणून त्या दोघांनी आपल्या घरातच बालहत्या प्रतिबंधकगृह काढले व बालिकाश्रम चालविला. अर्थात हे चालविणे सोपे काम नव्हते. याच बालहत्या प्रतिबंधकग्रहात काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा आली. ही काशीबाई पुण्याच्या नातू घराण्यातील होती तिच्या पोटी मुलगा जन्मास आला. हाच यशवंत होय. तो फुले पती पत्नी यांनी दत्तक घेतला. कारण त्यांना मूल नव्हते. १० जुलै १८८७ रोजी केलेल्या पती- पत्नीने त्यांच्या सावित्रीबाई व जोतिराव यांनी दत्तक घेतलेल्या मुलाविषयी माहिती आहे. 
        फूले पती-पत्नीने जे बालहत्या प्रतिबंधकगृह काढले होते त्यात इ.स. १८८४ पर्यंत ३५ ब्राह्मण विधवांची बाळंतपणे पार पडली होती. या बालहत्या प्रतिबंधकगृहास कोणतीही शासकीय आर्थिक मदत मिळत नव्हती. फूले पती-पत्नीने यशवंतच्या होणाऱ्या बायकोस लक्ष्मी ही ग्यानोबा कृष्णाजी ससाणे हडपसर यांची मुलगी होती. हिला लग्नाच्या अगोदर काही वर्षे शिक्षणासाठी स्वत:च्या घरी फूले यांनी पुण्यास आणून ठेवले होते. जोतिरावांच्या अग्नीसंस्काराच्या वेळी त्यांचा दत्तंक मूलगा यशवंत याला अग्ग्री देण्याबाबत जोतीरावांच्या नातेवाइकांनी अडवणूक केली तेव्हा सावित्रीने पतीच्या चितेला अग्नी दिला. पत्नीने पतीच्या चितेला अग्नी दिल्याचे हे भारतीय इतिहासातील पहिले उदाहरण आहे.
४) सत्यशोधक समाजातील कार्य :
२४ सप्टेंबर १८७३ रोजी म. फूले यांनी पुण्यात सत्यशोधक समाज स्थापन केली होता. म. फुले यांच्या मृत्यनंतर सत्यशोधक समाज संपला अशी हाकाटी सनातनी लोकांनी पिटली होती. पण सावित्रीबाईनी पतीच्या मृत्युनंतर मोठ्या हिमतीने व निष्टेने सत्यशोधक समाजाचे कार्य चालु ठेवले. आपला दत्तकपत्र यशवंत याचा विवाह सत्यशोधक विवाह पद्धतीनुसार करण्यात ४ फेब्रुवारी १८८९ सावित्रीबाईचाच पुढाकार होता. कारण त्यावेळी जोतिराव हे पक्षाघाताच्या आजाराने आजारी होते. इ.स.१८७६ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला. या दुष्काळाची तीव्रता व भयानकता सावित्रीबाईनी पत्र जोतिरावांन पाठविले होते त्यात दिसून येते. या दष्काळात अनाथ अपंग निराधारांची मदत करण्यासठ त्यांनी कैप तीन वर्षे चालवला. काही स्रीयांची मदत घेऊन अन्न शिजवून ते दुष्काळग्रस्तांना पोहोचविले. स्रीयांच्या केशवपनाविरुद्ध जो संप घडवून आणला त्याचे नेतृत्व नाराय मेधाजी लोखंडे यांनी केले असले तरी त्या संपाचे प्रेरणास्थान सावित्रीबाईच होत्या.
     म. फुले यांनी २५ डिसेंबर १८७३ रोजी सीताराम आल्हाट व राधाबाई ग्यानोवा निंबणकर यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह केला. या विवाहाचा खर्च अवधा १५ रुपये एवढाच होता. राधाबाई निंबणकर यांना वैचारिक व मानसिक आधार देण्याचे काम सवित्रीबाईनी केले.
     इ.स. १८७५-७६ या ३ वर्षांच्या सत्यशोधक समाजाच्या रिपोट मित्रपक्षाच्या वर्गणीदारांच्या यादीत सावित्रीबाईचे नाव आहे. त्यांनी २ रुपये देणगी दिल्याचा उल्लेख आहे. सत्यशोधक चळवळीच्या अनेक कामात सावित्रीबाईचा हात असल्याचे आता संशोधनात दिसून स्पष्ट होत आहे. इ.स. १८९१ मध्ये सावित्रीबाई अ.भा. सत्यशोधक समज्याच्या  अध्यक्षा होत्या. सासवड येथे सत्यशोधक समाजाची इ.स. १८९३ मध्ये जी विसवी परिषद झाली त्याचे अध्यक्षपद सावित्रीबाईनीच भूषवले होते. या परिषदेत त्यांनी सत्यशोधक तत्त्वज्ञानावर भाष्य करून सनातन्यांना ठणकावले होते. इ.स. १८९६ च्या दुष्काळातही त्यांनी दुष्काळयस्तांना मदत केली होती. १० मार्च १८९७ रोजी प्लेगचा आजार होऊन त्यातच त्यांचे निधन झाले होते.
५) सावित्रीबाईचे लेखन :
सावित्रीबाईनी शैक्षणिक, सामाजिक कार्य करीत मौलिक स्वरूपाची साहित्यनिर्मिती केली ती याप्रमाणे
१) काव्यफले (कवितासंबह) इ.स. १८५४
२) जोतिबांची भाषणे संपादक सावित्रीबाई फुले इ.स. १८५६
३) सावित्रीबाईची जोतिरावास पत्रे
४) मातुश्री सावित्रीबाईची भाषणे संपादक बाबाजी महाघट पानसरे पाटील
५) बावत्रकशी सुबोध रत्नाकर  इ.स. १८९२ सावित्रीबाईनी छवपती शिवाजी, महाराणी ताराबाई यांच्यावर काव्यरचना केली आहे
शूद्र-अतिशूद्रांच्या अवस्थेचे काव्याच्या माध्यमातून त्यांनी चित्रण केले आहे. शूद्रांच्या प्रश्नांवर शिक्षण हाच उपाय आहे. शिक्षणाने माणसातील शत्रूत नष्ट होते असा विचार त्या मांडतात. काव्यफुले या काव्यसंग्रहात एकूण ४१ कविता आहेत. या संग्रहातील पहिलीच कविता शिवत्रार्थना आहे. शद्र-अतिशद्रांच्या अवस्थेचे काव्याच्या माध्यमातन चीत्रन केले आहे. त्यात निसर्गविषयक सामाजिक बोधपर प्रार्थनापर आत्मपर कविता आहेत. सावित्रीबाई एका अर्थाने उपेशीत कवयित्री होत्या. त्यांच्या कविता वाङ्मयीनदृष्टया समृद्ध असूनही त्यांना एक ऐतिहासिक महत्त्वही आहे. जोतिवांची भाषणे हे छोटे पुस्तक सावित्रीबाईनी संपादित केले आहे. त्यात जोतिरावांची ४ भाषणे आहेत. सावित्रीबाईची जोतिबास पत्रे ही एकूण ३ असून ती नायगाव व ओतूरहून लिहिलेली आहेत. मातुश्री सावित्रीबाईची भाषणे या पुस्तकात उद्योग विद्यादान सदाचरण व्यसने कर्ज या विषयांवरील सावित्रीबाईची भाषणे शास्त्री नारो बाबाजी महाघट पानसरे पाटील यांनी संपादित करून वहोदा येथन प्रकाशित केली आहेत. बावत्रकशी सुबोध रत्नाकर या संग्रहात देशाचा इतिहास काव्यरूपाने सांगितला असून जोतिरावांच्या कार्याचे चित्रण त्यात आहे. यात ५२ रचना आहेत. हे काव्य जोतिरावांच्या मृत्यूनंतर इ.स.१८९२ मध्ये प्रकाशित करण्यात आले. हे सर्व एकृण वाइमय १९४ पृष्ठांच्या सावित्रीबाई फुले समत्र वाइमय या ग्रंथात एकत्रीत करण्यात आले आहे त्याचे संपादन डॉ. मा. गो. माळी यांनी केले आहे. ग्रंथाला मुपसिद्ध तत्वज्ञ डॉ. सरेंद्र बारलिंगे यांची प्रस्तावना आहे.
     ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट सरकार बालिका दिन म्हणून साजरा करत. पुणे विद्यापीठाचा नामविस्तार सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ असा करण्यात आला  इस. २०१४ या निर्णयाचे सर्व समाजघटकाकडून स्वागतच झाले
६) सावित्रीबाई फुलेंबद्दल अभ्यासकांचे अभिप्राय
धनंजय कीर यांच्या मते. १९व्या शतकात स्रीयांच्या उढारासाठी केलेले सावित्रीबाईसारखे अन्य आदर्श नि उदात्त उदाहरण कवचितच आढळून येईल. पंडिता रमाबाईचे पांडित्य नि भरारी त्यांच्या ठायी नसेल, परंत् मांगल्य, घडाडी, निर्व्याज मानवत आणि भारतीय धवलता या गुणांत पं. रमाबाई त्यांची बरोबरी करू शकल्या नाहीत. म फुले यांचे आद्य चरित्रकार व थोर सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील म्हणतात सावित्रीवाईच्या भारतीय स्त्रीच्या उत्थानासाठी केलेल्या सहदयी कार्याशी तुलन करता येणारे एकही उदाहरण १९ व्या शतकात सापडत नाही. डॉ, मा. गो. माली स्रीमुक्ती आंदोलनाच्या पहिल्या नेत्या या शब्दात सावित्रीबाईचा उल्लेख करतात. लक्ष्मण कराडी जाया हा सावित्रीवाईचा विद्यार्थी प्रतिक्रिया नोंदवितो सावित्रीबाईसारखी दयाळ व प्रेमळ अंत:करणाची स्वी मी अजूनसद्धा पाहिली नाही. ती आपल्या आई पेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करीत आहे. असेच त्यावेळी सर्व मलांना याटत होते.  डॉ.बाबा आढाव म्हणतात, सावित्रीबाईचे संपर्ण जीवन क्रांतिकारक आहे. प्रा. गं. बा. सरदार यांच्यामते चुल आणि मूल यात गुंतून न पडता, घराचा उंबरटा ओलांडणारी व सामाजिक कार्यात भाग घेणारी पहिली स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले होत. वरील अभिप्रायातून त्यांच्या अलौकिक कार्याची आपणास कल्पना येते सावित्रीबाईनी शिक्षण, जाती निर्मूलन पुरोहित हटाव, सामाजिक न्याय स्त्रीमुक्ती या क्षेत्रात मोठे कार्य केले. शूद्रांच्या प्रश्नांवर शिक्षण हाच उपाय आहे. शिक्षणाचे माणसातील पशुत्व नष्ट होते असा विचार त्या मांडतात. जोतीराव हे सावित्रीबाईचे फक्त पतीच नव्हते तर मित्र मार्गदर्शक व गुरू होते. प्रेरणास्थान होते. सावित्रीबाईच्या सर्व सुखदुःखाच्या ते भागीदार होते.


 

Popular

Technology: