Market Guru: Intraday आणि Delivery

जाणून घेऊयात शेअर मार्केट

updated:2023-02-24 07:11:41

...

Market Guru: याआधी आपण काही गोष्टी जाऊन घेतल्या आहेत. जर तुम्ही त्याबद्दल माहिती घेतली नसेल तर या आधीचे ब्लॉग तुम्ही वाचू शकता. शेअर मार्केट मध्ये उतरून नफा कमवायचा असेल तर सर्वच बाबी माहिती असणे गरजेचे ठरते. आपण कष्टाने कमावलेला पैसा असा सहजासहजी वाया घालवता कामा नये. आपण पैशाला किंमत देणे गरजेचे आहे. 

ज्यावेळेस तुम्ही शेअर्स खरेदी करता त्यावेळेस त्यात दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार - Intraday आणि  दुसरा प्रकार - Delivery 

Intraday : यात शेअर्स आपण रोज नफा कमविण्याच्या दृष्टीने खरेदी करत असतो. या प्रकारात आपण आज एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन आजच किंमत वाढल्यानंतर विकू शकतो. यामध्ये आपल्याला एक प्रकारची सूट मिळते. ती म्हणजे अशी की जर तुमच्याजवळ 5000 रुपये असतील तर तुम्ही 5000*5=25000 रुपये किमतीचे शेअर्स विकत घेऊ शकता. म्हणजेच तुमच्याजवळ असलेल्या रकमेच्या 5 पट अधिक किमतीचे शेअर्स विकत घेऊ शकता. त्याबदल्यात तुमचा जो कोणी ब्रोकर असेल त्याला अगदी साधारणतः 0.06% इतके व्याज द्यावे लागेल.

Delivery : यात आपण Long term साठी शेअर्स विकत घेत असतो. अगदी 1 दिवसापासून ते कितीही वर्षांपर्यंत आपण शेअर्स विकत घेऊन ठेवू शकतो. यात आपल्याकडे जेवढी रक्कम आहे तेवढ्याच किमतीचे शेअर्स विकत घेता येतात. यात कंपनी दरवर्षी आपल्या गुंतवणूक दारांना आर्थिक परतावा देते. 

जर तुम्ही रोज नफा कमविण्याच्या दृष्टीने शेअर मार्केट कडे पाहत असाल तर यापुढील ब्लॉग तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. पुढील वेळेस आपण Money Management बद्दल जाणून घेऊयात. 

लवकरात लवकर अपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

WHATSAPP GROUP  ला  JOIN होण्यासाठी  9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.

Popular

Technology: