MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीट करत जाहीर केले सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत आयोगाने ट्वीट करत माहिती दिली

updated:2023-02-23 13:11:47

...

MPSC: स्पर्धा परीक्षेकडे पाहताना तरुण वर्ग हा MPSC सारख्या परीक्षेकडे आकर्षित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्वच विद्यार्थी या क्षेत्रात वळतात. मागील वर्षी आयोगाने जाहीर केले होते की 2021 पासून सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम लागू करण्यात येईल. याआधी बहुपर्यायी प्रकारची परीक्षा आयोग घेत होते. नवीन अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक उत्तर लेखन पद्धतीचा अवलंब करण्याचा आयोगाचा निर्धार होता.

परंतु वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा ही होती. सततचा पाठपुरावा व आंदोलने व नवीन अभ्यासक्रम यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून आयोगाने त्यांची ही मागणी मान्य केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या twitter account वरून ट्वीट करत नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात येईल असे जाहीर केले. 

MPSC ने केलेले Tweet 

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.

यामुळे सर्वच विद्यार्थी आंनदी आहेत. 

परंतु विद्यार्थ्यांनी स्पर्धापरीक्षेच्या या मृगजळातून बाहेरही पडले पाहिजे हेही तितकेच सत्य आहे.

Popular

Technology: