कोणत्याही क्षेत्रातील पद म्हणजे सहकाऱ्यांनी त्या क्षेत्रात समूह हितासाठी उपलब्ध करून दिलेली संधी व काटेरी मुकुट असतो.
updated:2023-02-23 03:34:56
कोणत्याही क्षेत्रातील पद म्हणजे सहकाऱ्यांनी त्या क्षेत्रात समूह हितासाठी उपलब्ध करून दिलेली संधी व काटेरी मुकुट असतो. कोणत्याही माणसाचे महत्व हे पद मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही, तर तो त्या पदाला किती न्याय देतो, तो किती कार्यक्षम, कर्तृत्व, नेतृत्व दाखवतो यावरच त्याचे खरे व्यकि्तमत्व समाजाला समजते.
कर्तृत्चच नसेल आणि पद मिळाल्यामुळे अहंपणा, स्वार्थपणा, लबाडी व गर्व चढला असेल तर कालांतराने निशि्चतच त्याचा गर्व खाली होतो. पदामुळे तात्पुरते महत्व वाढते, पण चांगल्या कर्तृत्चामुळे आयुष्यभर महत्व राहते. पदामुळे आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवसि्थत वेळ देऊन पार पाडली पाहिजे. चांगली माणसं, सहकारी बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे, ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे, त्यांची जाणीव निरंतर व कायमच ठेवली पाहिजे. व्यक्ती जेंव्हा समाजात जितक्या उंचीवर पोहचते ती निव्वळ त्याच्या कर्तृत्वामुळे नव्हे, तर त्या व्यक्तीच्या सोबत असलेल्या बऱ्याच लोकांनी केलेला त्यागाचा सुद्धा त्यात महत्त्वाचा बाटा असतो. म्हणून संबंधितांनी आपल्या स्वतःला मोठं म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली माणसं मोठी असतात यांची जाणीव ठेऊन वागलेले बरं. ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे, त्या पायरीला कधीच विसरू नये. कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो..!
लक्षात असू द्या पद क्षणभंगुर असते, पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे, असे माणसांशी वागले पाहिजे. नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता, कर्तृत्व, बागणं, प्रामाणिकता व बोलणं पाहत असतो, ऐकत असतो आणि सहनही करत असतो, मात्र लबाडीपणा बाढला तर योग्य वेळी धडा शिकवतो ? कि तिथं तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते. म्हणूनच आपल्या माणसांशी, समाजाशी व विश्वासू मित्रांशी, नीट वागा, नीट बोला व आपले कर्तृत्व निस्वार्थी व चांगले आहे हे सिध्द करा, तरच लोक तुमच्या सोबत राहतील. जो दुसऱ्यांना मान देतो, मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो, जे त्याच्या जवळ असते. मनाचा मोठेपणा हा गुण आहे. जो पदाने नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने पद आहे म्हणूनच काम केलं पाहिजे अस नाही, पद हे आपण मागून नाहीतर आपल्या लोकांनी, समाजानी दिल पाहिजे तरच त्या कर्तुत्वाला मानसन्मान मिळतो. पद म्हणजे मी कृणी मोठा आहे हे ज्या दिवशी मनात येईल त्या दिवसापासून आपली उतरती कळा सुरू झाली हे समजून जा. यामुळे पदाचा गर्व टाळून पदाला न्याय मिळेल असेच काम करा.
लवकरात लवकर अपडेटसाठी
WHATSAPP GROUP ला JOIN होण्यासाठी 9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: