"महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम २०९६"

महाराष्ट्र शासनाने "महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम २०१६" हे १८ नोव्हेंबर. २०१६ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केले आहे.

updated:2023-02-22 15:23:21

...

     महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ मधील कलम २८ (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा उपयोग करून महाराष्ट्र शासनाने "महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम २०१६" हे १८ नोव्हेंबर. २०१६ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केले आहे. 
     महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियमामध्ये एकूण १९ नियम दिलेले असन या अधिनियमानुसार लोकसेवा प्राप्त करण्यासाठी करावयाचे ५ अर्जाचे नमुने देखील प्रसिद्ध केले आहेत. या पाचही अर्जाचे नमुने प्रस्तुत पुस्तकाच्या १० व्या प्रकरणात दिलेले आहेत
महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम
      महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम २०१६ यामधील नियमांची क्रमवार माहिती पुढीलप्रमाणे आहे. 
(१) संक्षिप्त नाव : हे नियम महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम २०१६ म्हणून ओळखले जातात.
(२) व्याख्या - यामध्ये अधिनियम, नमना व कलम याची व्याख्या नमूद केली आहे.
(३) सूचना फलकावर माहिती प्रदरि्शत करणे : यामध्ये सार्वजनिक प्राधिकरणांनी लोकसेवांसंबंधी प्रदरि्शत करावयाची माहिती, अर्जासोबत जोडावयाचे नमने याची माहिती नमद केली आहे. प्रकाशित माहिती मराठी भाषेत व आवश्यक तेथे इंग्रजी भाषेत असावी असे नमद केले आहे. सचनाफलकावर माहिती प्रदरि्शत केलेली नसल्यास मुख्य आयुक्त किंवा आयुक्त संबंधित विभागाच्या पदनिर्देशित अधिकाऱ्यावर कारवाई करतात. 
(४) निवडणुकीच्या कालावधीत तसेच नैसरि्गक आपत्तीच्या वेळी नियत कालमर्यादा वाढविणे : यामध्ये संसद, विधानमंडळ निवडणुका आणि पर, आग, भकंप य। नैसरि्गक आपत्तीच्या वेळी अधिनियमाच्या कलम ३ प्रमाणे लोकसेवेसाठीची नियत कालमर्यादा वाढवता येईल असे नमूद केले आहे.
(५) अर्ज स्वीकारण्यासाठी पदनिर्देशित अधिकाऱ्याने अन्य अधिकाऱ्यास प्राधिकृत करणे : यामध्ये पदनिर्देशित अधिकान्याने अर्ज स्वीकारण्यासाठी प्राधिकृत केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव सूचनाफलकावर प्रदरि्शत करावे असे नमूद केले आहे. 
(६) अर्जदारास पोहोच देणे : पात्र व्यक्तीने लोकसेवेसाठी अर्ज केल्यानंतर तिला नमुन एक मध्ये पोहोच द्यावी असे म्हटले आहे.
(७) अर्जाचा नमुना व सोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे : यामध्ये अर्जाचा नमुना मराठी व इंग्रजी भाषेमध्ये तयार करणे, आपले सरकार पोर्टलवर अर्जाची उपलब्धता, परिपूर्ण पुरावे जोडून अर्ज सादर करणे, अर्जाची पोहोच देणे इत्यादी माहिती नमूद केली आहे. 
(८) शुल्काचे (फी) प्रदान : यामध्ये शुल्काचे प्रदान प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन करावे असे नमूद आहे. 
(९) अर्ज फेटाळण्याची सूचना : यामध्ये अर्ज फेटाळण्याची लेखी कारणे द्यावीत तसेच अर्ज फेटाळल्यानंतरचे अपील कोणाकडे करावे याची माहिती नमूद केली आहे. 
(१०) अर्जाची सि्थती पाहण्यासाठी यंत्रणा : यामध्ये लोकसेवेसाठी जमा केलेल्य। अर्जाल। एक युनिक क्रमांक द्यावा, जेणेकरून त्याची ऑनलाइन पाहणी करता येईल असे नमूद केले आहे.
(११) अपिलाची कार्यपद्धती :  यामध्ये प्रथम अपिलीय प्राधिकायकडे नमना क्रमांक दोन प्रमाणे आणि दि्वतीय अपील प्राधिकाऱ्याकडे नमुना क्रमांक तीन प्रमाणे अर्ज करावा असे नमुद केले आहे. 
(१२) अपिलासोबत जोडावयाची कागदपत्रे : यामध्ये अपील काताना अपिलासोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी, ज्या आदेशाविरुद्ध प्रथम किंवा दि्वतीय अपील करण्यात येत असेल त्या आदेशाची स्वसाक्षांकित प्रत, प्रथम किंवा द्वितीय अपिलामध्ये उपयोग केलेल्या कागदपत्रांच्या प्रती यांची माहिती नमद केली आहे. 
(१३) सुनावणीची नोटीस बजावणे : यामध्ये नोटीस प्रत्यक्ष, टपालाने, ईमेल, एसएमएस, मोबाईल ॲप्स इत्यादपिैकी कोणत्याही पद्धतीने बजावता येईल असे नमूद केले.
(१४) अर्जदार किंवा पदनिर्दशित अधिकारी यांची व्यकि्तरा: उपसि्थती : प्रथम आणि दि्वतीय अपिलाच्या सर्व प्रकरणी अपीलकर्ते आणि पदनिर्देशित अधिकारी त्याचप्रमाणे दि्वतीय अपिलाचे प्रकरण असल्यास प्रथम अपिलीय अधिकारी यांना सुनावणीचा दिनांक किमान ७ दिवस अगोदर कळविण्यात येतो. सुनावणीची रीतसर नोटीस बजावल्यावरही जर एखादा पक्षकार सुनावणीस अनुपसि्थत राहिला तर त्याच्या अनुपसि्थतीत अपील निकाली काढले जाते.
(१५) अपिलावर निर्णय घेण्याची कार्यपद्धती : अपिलावर निर्णय घेताना अपिलीय प्राधिकारी हे पदनिर्देशित अधिकारी आणि अपीलकर्ता यांना अपिलाच्या सनावणीच्या वेळी बोलावतात. ते अपिलाशी संबंधित कगदपत्रे व त्यांच्या प्रतीची छाननी करून सुनावणीच्या वेळी पदनिर्देशित अधिकारी व अपीलकर्त्यांची बाजू ऐकून घेतात.
(१६) प्रथम किंवा दि्वतीय अपिलावरील आदेश : अपिलीय प्राधिकारी प्रथग किंवा दि्वतीय अपिलाचे आदेश लेखी स्वरूपात देतात. अपिलासंबंधीच्या आदेशाची प्रत अपीलकर्ता, पदनिर्देशित अधिकारी किंवा प्रथम अपील प्राधिकारी यांना देण्यात येते
(१७) अधिनियमांतर्गत प्रकरणांची नोंद ठेवणे : पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय प्राधिकारी आणि दि्वतीय अपिल प्राधिकारी नमुना चारगध्ये प्रकरणांची नोंदवही एकतर व्यकि्तशः किंवा इलेक्ट्रानिक नमुन्यात ठेवतात.
(१८) आयोगाकडे दाखल करण्यात येणारे अपील : दि्वतीय अपील प्राधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध नमुना क्रमांक पाचमध्ये अपील दाखल करता येते.
(१९) मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांच्या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर नेमलेले अधिकारी व अन्य कर्मचारी यांचे वेतन व भत्ते, सेवेच्या अटी व शर्ती : राज्य शासनाचा कोणताही विभाग किंवा गंडळ यामधून मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांच्या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर नेगणूक करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या सेवेनुसार लागू असतील अशा नियमानुसार त्यांना अनुज्ञेय असणारे वेतन व भत्ते देण्यात येतात. तसेच त्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक शर्ती व शिस्तविषयक बाबी राज्यशासनाप्रगाणेच असतात. तसेच त्या कर्मचाऱ्यांचा पदावधी राज्य शासन आदेशाद्वारे निर्धारित करते.

लवकरात लवकर अपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

WHATSAPP GROUP  ला  JOIN होण्यासाठी  9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.

Popular

Technology: