"ग्रामपंचायत"

महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेचा मूलभूत घटक म्हणजे "ग्रामपंचायत" होय.

updated:2023-02-21 09:06:01

...


     महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेचा मूलभूत घटक म्हणजे "ग्रामपंचायत" होय.  "मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८"  नुसार ग्रामपंचायती संघटित केल्या जातात. या कायदचात अर्थातच वेळोवेळी योग्य असे बदल झालेले आहेत
     रचना: ग्रामपंचायतीत किमान ७ आणि कमाल १७ सदस्य असतात आणि त्यांना "पंच" असे म्हटले जाते. पंचांची निवड गावातील पात्र मतदार प्रत्यक्षपणे करतात. गावाचे विविध प्रभागांत विभाजन केले जाते आणि प्रत्येक प्रभागातन एक सदस्य ग्रामपंचायतीवर निवडला जातो. ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यसंख्येच्या १/३ जागा महिलांसाठी आणि २७ टक्के जागा इतर मागासवर्गासाठी राखीव असतात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीना एकुण लोकसंख्येतील त्यांचे प्रमाण विचारात घेऊन राखीव जागांच्यादवारे प्रतिनिधित्व दिले जाते
     ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्ल्या किमान ५०० असावी लागते. ५०० पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकति्रतपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. लोकसंख्या हा निकष मानून ग्रामपंचायतींचे अ, ब व क या तीन श्रेणीमध्ये वर्गीकरण केले जाते.
     सरपंच आणि उपसरपंच : ग्रामपंचायतीचे सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच म्हणून आणि अन्य एकाची उपसरपंच म्हणन निवड करतात. सरपंच उपसरपंच यांचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असून त्याला खालील कामे पार पाडावी लागतात:
     (१) ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या सभा आमंत्रित करणे आणि अध्यक्षस्थान भूषविणे.
     (२) ग्रामपंचायतीने संमत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. 
     (३) ग्रामपंचायताच्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवणे, कर गोळा करणे आणि ग्रामपंचायतीच्या कामाचा वार्षिक अहवाल तयार करणे
     ग्रामसेवक : ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामसेवकाची नेमणूक करते. ग्रामपंचायतीचे हिशेब आणि महत्वाची कागदपत्रे ग्रामसेवक सांभाळतो. ग्रामपंचायतीच्या सभांच्या कामकाजाच्या आणि निर्णयांच्या नोदी ठेवणे ही कामेसुद्धा ग्रामसेवक करतात.
                             ग्रामसभा 
     स्थानिक पातळीवरील लोकांची संघटना म्हणजे "ग्रामसभा" होय. लोकशाहीचा ग्रामसभा हा मूलभूत घटक आहे. ग्रामपंचायती संबंधीच्या मूळ कायदात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद होती परंतु ग्रामसभा कधीच प्रभावीपणे काम करीत नव्हत्या ७३व्या घटना दुरुस्तीने आजच्या पंचायती राज्यव्यवस्थेत ग्रामंसभेला अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले. आता आपल्या गावात योग्य बदल घडवून आणण्यासाठी ग्रामसभेला पाकरभेता येतो. गावातील लोकांना एकत्र येऊन गावाच्या समस्यांची चर्चा करण्याचे व्यासपीठ ग्रामसभेमुळे उपलब्ध झाले आहे. ग्रामसभेच्या वर्षातून किमान सहा सभा आमंत्रित करण्याचे बंधन सरपंचावर असते. अशा सभांची माहिती लोकांना बरेच दिवस आधी दिली जाते. सभेच्या आदल्या दिवशी पुन्हा आठवण करून दिली जाते. लोकांनी मोठचा संख्येने सभेला हजर राहावे हा त्यामागील हेतू असतो. ग्रामसभेतील चर्चेत गावकरी सहभागी होतात. त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो व पदाधिकाऱ्यांना त्याची उत्तरे देण्याचे बंधन असते. दोन दिवसांची पूर्वसूचना देऊन ग्रामसभेत गावकऱ्यांना ठराव मांडता येतो
     ग्रामसभा ही प्रामुख्याने गावासंबंधीच्या प्रश्नांची चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. त्यातून ग्रामस्थांना विविध विषयांवर आपली मते व तक्रारी व्यक्त करण्याची संघी मिळते. ग्रामीण राजकारणात त्यामुळे खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते.
     ग्रामपंचायतीची कामे : ग्रामपंचायत पुढील कामे पार पाडते.
     (१) पाणीपुरवठा
     (२) रस्तेबांधणी
     (३) सार्वजनिक स्वच्छता
     (४) जन्म-मृत्यूची नोदणी
     (५) प्राथमिक शिक्षणास साहाय्य
     (६) आरोग्याच्या संदर्भात शासनाच्या प्रतिबंधात्मक उपायांना मदत करणे.
     घरपटटी पाणीपटी आणि यात्रा कर ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील ३०% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो. विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यशासन ग्रामपंचायतीला अनुदान देते. चार दशकांपेक्षा अधिक काळ पंचायत राजव्यवस्था महाराष्ट्रात राबविली जात आहे. स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग या संस्थांमुळे वाढला आहे. समाजातील दर्बल घटकांचे या संस्थांमुळे सक्षमीकरण होण्यास मदत झाली आहे. त्यांना सत्तेत सहभागी होऊन आपली परिस्थिती बदलण्याची संधी पंचायती राज व्यवस्थेमळे मिळाली त्यातन गतिमान नेतृत्व देऊ शकणारी एक नवी पिढी ग्रामीण राजकारणात उदयास आली. 
    महाराष्ट्रात हा बदल निश्चितपणे जाणवत आहे. महिलांचा राजकीय सहभाग वाढला आहे. महत्त्वाच्या पदांवर आता महिला स्वबळावर निवडून येत आहेत आणि महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. अर्थात लोकशाहीचे पायाभूत घटक आणि ग्रामीण विकासाच्या यंत्रणा म्हणून प्रभावीपणे काम करण्यासाठी आणखी सुधारणा होणे आवश्यक आहे.
 

लवकरात लवकर अपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

WHATSAPP GROUP  ला  JOIN होण्यासाठी  9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.

Popular

Technology: