रात्रभर जागता सकाळी उशिरापर्यंत झोपता? ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी घातक, होतील गंभीर आजार.
updated:2023-02-20 07:36:34
आपण रात्री उशिरापर्यंत मोबाईल हातात घेऊन जागता का? अनेकांच्या खराब लाईफस्टाईलचं मुख्य कारण मोबाईल बनत चाललं आहे. प्रत्येकाची जीवनशैली बदलत चालली आहे. रात्रभर जागता सकाळी उशिरापर्यंत झोपता? ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी घातक, होतील गंभीर आजार. झोपेच्या दिनक्रमाकडे लक्ष देणं आवश्यक. झोप अपुरी झाली की, दुसऱ्या दिवशी आपल्या वागण्यावर परिणाम दिसून येते. सतत होणाऱ्या अपुर्या झोपेमुळे शारीरिकसह मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. रात्री उशिरा झोपणे किंवा निद्रानाश होणे ही एक गंभीर समस्या आहे. याच्यामुळे मानसिकसह शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराच्या संबंधित आजार, स्ट्रोक, मधुमेह यासह इतर आजार उद्भवण्याची शक्यता आहे. जे लोक रात्री ११ नंतर झोपतात त्यांच्यामध्ये हृदयरोग किंवा स्ट्रोकचा धोका २५ टक्क्यांनी वाढतो. अनेकांना रात्री जागे राहण्याची सवय लागते, अशा स्थितीत त्यांच्यामध्ये हृदयाच्या संबंधित आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. जे लोकं रात्री लवकर झोपतात त्यांना टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. झोपेच्या चुकीच्या सवयींमुळे टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो. या आजाराने ग्रस्त असलेले लोकं ६ तासांपेक्षा कमी झोपतात. ज्यामुळे मूड स्विंग होतात. अशा परिस्थितीत डिप्रेशन होण्याची शक्यता वाढते. मन नैराश्याच्या स्थितीत जाते. व सकाळी उठल्यानंतर काम करण्याची इच्छा कमी होते. झोपेची बिघडलेली सवय, कॅन्सरची शक्यता वाढवण्याचे काम करते. सकाळी उशिरापर्यंत झोपणाऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका दुप्पट वाढतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आजच्या काळात खूप गरज आहे. ही प्रत्येकाने घेतली पाहिजे. आपण आपले आरोग्याकडे लक्ष नाई देणार मग कोण देणार त्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे.
लवकरात लवकर अपडेटसाठी
WHATSAPP GROUP ला JOIN होण्यासाठी 9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: