तुम्ही घरीच हे काही नैसर्गिक उपाय करून पहा यामुळे कंड सुटण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
updated:2023-02-12 10:26:12
तुम्ही घरीच हे काही नैसर्गिक उपाय करून पहा यामुळे कंड सुटण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्वचेला खाज येणे ही अतिशय त्रासदायक गोष्ट आहे. जितके जास्त खाजवाल तितकी खाज कंड जास्त येते. अतिप्रमाणात खाजवल्यास त्वचेला हानी पोहचून संसर्ग होण्याचा धोका असतो.
1)कोरफड
कोरफडातील औषधी गुणधर्म त्वचेतील दमटपणा योग्य प्रमाणात राखण्यास व त्वचेला थंडावा देण्यास मदत करतात. कोरफडातील गर खाज येत असलेल्या भागावर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे खाज कमी होण्यास मदत होईल.
२)तुळस
तुळशीतील औषधी गुणधर्म शरीरावरील खाज कमी करण्यास मदत करतात. तुळशीची पानं त्वचेवर खाज येत असलेल्या भागावर चोळा. किंवा पाण्यात काही तुळशीची पाने टाकून काढा बनवा. त्या पाण्यात कापसचा बोळा किंवा कपडा बुडवून तो खाज त्वाचेवर येत असलेल्या भागावर लावा.
३)बेकिंग सोडा
शरीराच्या लहानशा भागावर येणार्या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा फारच उपयुक्त आहे. 3 भाग सोड्यात 1 भाग पाणी एकत्र करून त्याची पेस्ट करा व खाज येणार्या भागावर लावा. मात्र त्वचेवर चिर गेली असल्यास किंवा जखम असल्यास हा उपाय करू नये. शरीरभर खाज सुटत असेल तर कपभर सोडा कोमट पाण्याच्या बाथटब मध्ये टाकून आंघोळ करा. किंवा अर्धा तास त्यात पडून रहा.
४)लिंबू
व्हिटामिन सी ने युक्त लिंबात ब्लिचिंग क्षमतादेखील असल्याने त्वचेचा कंड कमी होण्यास मदत होते. तसेच लिंबामुळे त्वचेत होणारी दाहकता कमी होते. त्वचेच्या ज्या भागावर खाज सुटते तेथे लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. वार्यावरच हे थेंब सुकू द्या. काहीवेळाने तुम्हाला त्रास कमी होत असल्याचे जाणवेल.
५)पेट्रोलियम जेली
जर तुमची त्वचा खुपच संवेदनशील असेल तर पेट्रोलियम जेली फारच उपयुक्त आहे पेट्रोलियम जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने त्वचेतील सौम्यता राखण्यासाठी पेट्रोलियम जेली मदत करते. त्यामुळे कंड कमी करून त्वचेचे नुकसान होण्यापासून तुमचा बचाव होतो.
६)खोबरेल तेल
कधी त्वचेच्या शुष्कतेमुळे तर कधी कीटकाच्या दंशामुळे शरीराला खाज येण्याची शक्यता असते. अशावेळेस त्यावर खोबरेल तेल चोळल्यास त्यापासून आराम मिळवण्यास नक्कीच मदत होते. जर शरीरावर सर्वत्र खाज सुटत असेल तर कोमट पाण्याच्या बाथटबमध्ये पडून रहा. त्यानंतर शरीर कोरडे करून शरीराला तेल लावा.
शरीराला कंड सुटत असल्यास खाजवून त्वचेची हानी करण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करा. मात्र वेळीच आराम न मिळाल्यास त्यामागील नेमके कारण शोधा व डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लवकरात लवकर अपडेटसाठी
JOIN TELEGRAM CHANNEL
WHATSAPP GROUP ला JOIN होण्यासाठी 9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: