पंतप्रधान किसान संपदा योजना ही अन्न प्रक्रिया मंत्रालयाची प्रमुख योजना आहे. अन्न प्रक्रिया मंत्रालयाने 2016-20 या कालावधीसाठी 6,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह योजनेची सुरुवात करण्यात आली होती.
updated:2023-01-29 04:10:32
पंतप्रधान किसान संपदा योजना ही अन्न प्रक्रिया मंत्रालयाची प्रमुख योजना आहे. अन्न प्रक्रिया मंत्रालयाने 2016-20 या कालावधीसाठी 6,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह योजनेची सुरुवात करण्यात आली होती. अलीकडेच केंद्राने योजनेसाठी आणखी 4,600 कोटी रुपयांची तरतूद करून योजनेचा कालावधी मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
काय योजना आहे?
या योजनेंतर्गत सरकार कृषी उत्पादनांच्या शेतातून < किरकोळ दुकानांपर्यंतच्या सुरळीत वाहतुकीसाठीचे व्यवस्थापन आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मदत करते.
या योजनेमुळे अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणे अपेक्षित आहे तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांचा वाजवी भाव आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा देखील या योजनेचा उद्देश्य आहे.
सद्यस्थितीतील अन्न प्रक्रिया युनिट्सचे आधुनिकीकरण /विस्तार आणि मूल्यवर्धन तसेच त्यांची प्रक्रिया आणि संरक्षण क्षमता वाढवून कृषी उत्पादनांची नासाडी रोखण्यावर देखील या योजनेत भर देण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत मेगा फूड पार्क, कोल्ड चेन, कृषी प्रक्रिया क्लस्टरसाठी पायाभूत सुविधांचा विकास यांसारखी अनेक कामे केली जातात.
स्रोत: अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय अधिकृत वेबसाईट
लवकरात लवकर अपडेटसाठी
WHATSAPP GROUP ला JOIN होण्यासाठी 9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: