सध्या सर्व वयोगटांमध्ये अपेंडिसाइटिसची प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसून येत आहेत. ओटीपोटात दुखणे, मळमळ, ताप आणि उलट्या हे अपेंडिसाइटिसची काही प्रमुख लक्षणं
updated:2023-01-25 02:05:58
अपेंडिसाइटिस ही सामान्य समस्या असली तरी, त्रास वाढल्यास ती जीवावर बेतू शकते. सध्या सर्व वयोगटांमध्ये अपेंडिसाइटिसची प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसून येत आहेत. ओटीपोटात दुखणे, मळमळ, ताप आणि उलट्या हे अपेंडिसाइटिसची काही प्रमुख लक्षणं अपेंडिक्सचं वेळीच निदान व उपचार न झाल्यास अपेंडिक्स फुटण्याची शक्यता अधिक असते. यामुळे इफेक्शन होऊन रूग्णाला प्राण गमवावा लागू शकतो. पोटाच्या उजव्या खालच्या भागात मोठ्या आतड्याची एक लहान थैलीसारखी रचना आहे. जास्त त्रास झाल्यास शस्त्रक्रियेद्वारे अपेंडिक्स काढून टाकणं हा एकमेव उपाय ठरतो. अनेकांना अपेंडिक्सचा त्रास असतो, मात्र त्यांना तो लवकर ओळखता येत नाही. आजाराचे निदान वेळेवर निदान झाले तर त्यावर उपचार करणं सोपं जातं. काहींना या आजाराच्या लक्षणांबद्दल पुरेशी माहिती नसते. त्यामुळे अपेंडिसाइटिस बाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं खूप गरजेचं असल्याचं डॉ. पंकज गांधी यांनी म्हटलं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जठरांत्रीय आजारांमध्ये आवश्यक असलेल्या शस्त्रक्रियेपैकी ३-५ टक्के तीव्र अपेंडिसाइटिसचा समावेश होतो. ही समस्या १५ ते ३० वर्ष वयोगटात प्रामुख्याने आढळते. हेल्थलाइनच्या मते, नाभीभोवती वेदना होणे १०० ते १०१ डिग्री ताप येणे
पोटात गॅससह बद्धकोष्ठता आणि अतिसार गॅस बाहेर काढण्यास अडचण ही या आजाराचे मुख्य लक्षण आहेत. ओटीपोटाच्या खालच्या उजव्या बाजूला वेदना. भूक न लागणे,ओटीपोटात वेदना सुरू झाल्यानंतर मळमळ आणि उलट्या. ओटीपोटात सूज, अपेंडिक्स टाळण्यासाठी आहारात तंतुमय भाज्या खाव्यात. संपूर्ण धान्य, कडधान्ये, बटाटे, कोशिंबीर, ताजी फळे आणि भाज्या शरीराला पोषक तत्त्वे देतात आणि शरीरातून न पचलेले अन्न बाहेर काढण्यास मदत करतात. अपेंडिसायटिसवर अँटिबायोटिक्सच्या मदतीने वेळीच उपचार केले तर तो शस्त्रक्रियेशिवाय बरा होऊ शकतो.
अपेंडिक्ससाठी घरगुती उपाय: अपेंडिक्सचा त्रास जाणवू लागल्यास मेथीचे सेवन करा. मेथीमुळे वेदना आणि सूज येण्यापासून आराम मिळतो. एक लिटर पाण्यात दोन चमचे मेथीचे दाणे अर्धा तास उकळवा आणि ते पाणी गाळून ते पाणी प्या. अपेंडिक्समुळे ज्या ठिकाणी वेदना होतात त्या बदामाच्या तेलाने मसाज करा. बदाम तेल जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत करेल. भाज्यांचा ज्यूस प्या, गाजर, काकडी, अशा फळांचा ज्यूस वेदना आणि सूज दूर करण्यास मदत करेल.
लवकरात लवकर अपडेटसाठी
WHATSAPP GROUP ला JOIN होण्यासाठी 9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: